---Advertisement---

अर्शदीपच्या निवडीनंतर आईने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझ्या मुलाने या वयात…”

On: मंगळवार, सप्टेंबर 13, 2022 4:27 PM
Arshdeep-Singh-Celebration
---Advertisement---

पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी20 विश्वचषक 2022 साठी बीसीसीआयने मंगळवारी (12 सप्टेंबर) 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात हा विश्वचषक खेळला जाणार आहे. टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात पंजाबचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याची निवड केली गेली. त्याच्या निवडीनंतर आता त्याच्या आईने एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या 23 वर्षाचा असलेला अर्शदीप 2018 अंडर नाईन्टीन विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. मागील तीन वर्षापासून तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करत आला आहे. त्याचेच बक्षीस म्हणून त्याला यावर्षी भारतीय संघात संधी देण्यात आली होती. आतापर्यंत भारतीय संघासाठी खेळायला मिळालेल्या सर्व सामन्यांमध्ये त्याने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध मोक्याच्या क्षणी झेल सोडल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही व्हावे लागलेले.

विश्वचषकासाठी भारतीय संघात ज्या वेगवान गोलंदाजांचा समावेश केला गेलाय, त्यापैकी अर्शदीप सर्वात युवा आहे. त्याची संघात निवड झाल्यानंतर त्याची आई बलजीत कौर यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना म्हटले,

“भारताच्या विजयात योगदान देण्यापासून ते पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव, अर्शदीपने आतापर्यंतच्या छोट्या कारकिर्दीत बरेच काही पाहिले आहे. अशा गोष्टींनी त्याला खूप काही शिकवले. नेहमी सकारात्मक राहणे देखील त्यापैकीच एक मोठी शिकवण आहे. त्याचे नाव भारताच्या टी20 विश्वचषक संघात सामील होणे, हा क्रिकेट चाहत्यांव्यतिरिक्त अर्शदीप तसेच संपूर्ण कुटुंबासाठी एक खास क्षण आहे. अर्शदीपच्या नावाची घोषणा झाली तेव्हा मी संध्याकाळची प्रार्थना करत होते. आगामी टी20 विश्वचषक स्पर्धेत भारताला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी अर्शदीपच्या चांगल्या कामगिरीची मी प्रार्थना केली.”

अर्शदीप सिंगने आतापर्यंत भारतीय संघासाठी 11 टी20 सामने खेळले असून, त्यात 14 बळी मिळवले आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट साडे सातपेक्षा कमी राहिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---