भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारताने ३-० ने विजय मिळवत वेस्ट इंडिजला क्लीन स्विप दिला. त्यानंतर आता सध्या पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) रोजी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ६८ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सर्वांची मने जिंकली. सामन्यानंतर बोलताना अर्शदीपने आपल्या गोलंदाजीचे गुपित उघड केले.
सामन्यानंतर बोलताना अर्शदीप म्हणाला,
“हा एक शानदार अनुभव होता. स्वतःच्या कामगिरीने मी समाधानी आहे. संघ जिंकल्याने आनंद द्विगुणित झाला. मी अनेक दिवसांनंतर खेळत होतो. पारस सरांसोबत मी माझ्या गोलंदाजीवर काम करत आहे. यात आम्ही यशस्वी ठरतोय. गोष्टी शक्य तितक्या सोप्या ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. खेळपट्टीचा फायदा उचलत तशाच प्रकारची गोलंदाजी करण्यावर माझा भर आहे. मी माझ्या भूमिका आणि जबाबदारी ओळखतो. संघ व्यवस्थापन व कर्णधाराने मला माझी भूमिका सांगितली आहे. त्यामुळेच मला आत्मविश्वास मिळाला आणि मी त्या रणनीतीनुसार गोलंदाजी करू लागलो. भुवी भाईने दुसऱ्या बाजूने दबाव बनवून ठेवला आणि मला बळी मिळाले.”
वेस्ट इंडीजविरूद्धच्या पहिल्या सामन्यात अर्शदीपने चार षटकात २४ धावा देत दोन प्रमुख गडी बाद केले होते.
तेवीस वर्षीय अर्शदीप मागील तीन वर्षापासून आयपीएलमध्ये पंजाब किंग्ससाठी शानदार कामगिरी करतोय. याच कामगिरीचे बक्षीस त्याला नुकतेच मिळाले. इंग्लंड दौऱ्यावर त्याला टी२० पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! क्रिकेटच्या मैदानात पुन्हा होणार ‘दादागिरी’, कसं ते घ्या जाणून
CWG 2022: टपरी चालवणाऱ्या बापाचे कष्ट फळले! २१व्या वर्षी मुलाने भारताला मिळवून दिलं पदक
‘द्रविडच्या विचारांचा संघाला फायदा नाही’, महत्त्वाच्या खेळाडूला बाहेर ठेवल्यामुळे भडकला माजी दिग्गज






