रविवारी (दि. 17 डिसेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात जोहान्सबर्ग येथे पहिला वनडे सामना दिमाखात रंगला. या सामन्यात यजमान आफ्रिकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताचा हुकमी एक्का असलेला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने त्यांचा हा निर्णय प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. त्याने आपल्या पहिल्याच षटकात एका पाठोपाठ एक अशा दोन विकेट्स नावावर केल्या. त्यामुळे भारतीय संघ फायद्यात, तर दक्षिण आफ्रिका संघ दबावात आला.
अर्शदीपच्या दोन विकेट्स
न्यू वाँडरर्स स्टेडिअम (New Wanderers Stadium) येथे सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रीझा हेंड्रिक्स (Reeza Hendricks) आणि टोनी डी झोर्झी (Tony de Zorzi) उतरले होते. यावेळी भारताकडून डावाचे दुसरे षटक अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) टाकत होता. अर्शदीपने यावेळी पहिला चेंडू निर्धाव टाकला. यानंतर दुसरा चेंडू त्याने वाईड टाकला. पुढे याच चेंडूवर डी झोर्झीने एक धाव घेतली. तिसरा चेंडू हेंड्रिक्सने निर्धाव खेळला. मात्र, चौथ्या चेंडूवर रीझाने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हाच चेंडू बॅटची कड घेत थेट स्टम्प्सला जाऊन लागला. त्यामुळे हेंड्रिक्सला यावेळी 8 चेंडू खेळून शून्यावर तंबूत जावे लागले.
पुढे तिसऱ्या क्रमांकावर विस्फोटक फलंदाज रासी व्हॅन डर ड्युसेन (Rassie van der Dussen) आला. यावेळी अर्शदीपने त्यालाही जास्त वेळ टिकण्याची संधीच दिली नाही. त्याने आपल्या पाचव्या चेंडूवर ड्युसेनलाही पायचीत बाद केले. अशाप्रकारे ड्युसेननही 1 चेंडूत शून्य धाव करून गोल्डन डक झाला आणि तंबूत परतला. यावेळी अर्शदीपकडे हॅट्रिकची संधी होती, पण अखेरच्या चेंडूवर कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markram) याने चेंडू निर्धाव खेळला. अशाप्रकारे अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात फक्त दोन धावा खर्च करत 2 महत्त्वाच्या विकेट्स नावावर केल्या.
2 wickets in 2 balls for Arshdeep.
He gets Dussen for Golden duck – What a bowling. ⭐ pic.twitter.com/sxOiHDeS4f
— Johns. (@CricCrazyJohns) December 17, 2023
भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका संघ-
रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन (यष्टीरक्षक), डेविड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी (Arshdeep Singh takes two wickets in First Over ind vs sa odi)
हेही वाचा-
INDvsSA 1st ODI: यजमानांनी जिंकला टॉस, भारताकडून ‘या’ धुरंधराचे वनडे पदार्पण; पाहा Playing XI
Rohit Sharma vs Hardik Pandya: हार्दिकला कर्णधार बनवल्याने मुंबई इंडियन्समध्ये पडली फूट? खेळाडूंचंही पटेना?