टी20 विश्वचषकात रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) हा सामना खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 134 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिके पुढे ठेवले. सोप्या दिसणाऱ्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने दुसऱ्याच षटकात दक्षिण आफ्रिकेचे दोन प्रमुख फलंदाज तंबूत पाठवले. यासोबतच त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या यशाची मालिका अशीच सुरू ठेवली.
इतर फलंदाज अपयशी ठरल्यानंतर सूर्यकुमार यादवने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने 9 बाद 133 अशी मजल मारली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला भुवनेश्वर कुमारने कंजूस षटक टाकत चांगली सुरुवात करून दिली. मात्र, संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक टाकताना त्याने पहिल्याच चेंडूवर क्विंटन डी कॉकला दुसऱ्या स्लिपमध्ये राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर त्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने मागील दोन सामन्यात शतके ठोकणाऱ्या रायली रुसो याला शून्यावर पायचित केले. याबरोबरच अर्शदीपने तिसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना पहिल्या षटकात दोन किंवा त्यापेक्षा अधिक बळी टिपले.
मागील महिन्यात दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला असताना अर्शदीपने तिरुअनंतपुरम येथील सामन्यात पहिल्या षटकात 7 धावा देत तिघांना तंबूचा रस्ता दाखवलेला. त्यानंतर गुवाहाटी येथील सामन्यातही त्याने अशाच प्रकारे गोलंदाजी करत 5 धावा देत दोघांना बाद केलेले. त्यानंतर आता पर्थ येथे 4 धावा देऊन दोघांचे बळी टिपले. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी20 सामने खेळताना त्याने तीनही सामन्यात पहिले षटक टाकत असताना 16 धावांत 7 बळी मिळवले. यामध्ये विशेष म्हणजे या तीनही वेळी रायली रुसो हा शून्यावर बाद झाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तान सेमीफायलमधून बाहेर झाल्यावर आनंद होईल, पण…’, बीसीसीआय अध्यक्षांचे मोठे वक्तव्य
“जर रिषभ पंत पाकिस्तानात असता, तर वर्ल्डकपमधून कधीच बाहेर बसवलं नसतं”





