टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील चौथा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) सामन्यात खेळवला जाणार आहे. रविवारी (दि. 23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पार पडणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने दुसऱ्याच षटकात योग्य ठरवला.
What a start 🔥#T20WorldCup | #INDvPAK | 📝 https://t.co/H9EE5QNNwb pic.twitter.com/F326llQKzv
— ICC (@ICC) October 23, 2022
एमसीजीच्या मैदानावरील जवळपास सव्वा लाख लोकांच्या साक्षीने खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारताला दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यश मिळाले. भारतातर्फे विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या अर्शदीप सिंगने आपला पहिलाच चेंडू टाकताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या पॅडवर चेंडू मारला. मैदानवरील पंच मरायस इरास्मस यांनी भारतीय खेळाडूंनी अपील केल्यानंतर बाबरला बाद दिले. मात्र, बाबरने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. परंतु त्याचा फायदा झाला नाही व तिसऱ्या पंचांनी इरास्मस यांचा निर्णय कायम ठेवला. यासोबतच बाबर तिसऱ्यांदा गोल्डन डक म्हणजे पहिल्याच चेंडूवर खातेही न खोलता तंबूत परतला. भारतातर्फे विश्वचषकात पहिला चेंडू टाकताना बळी मिळवण्याची कामगिरी यापूर्वी प्रज्ञान ओझा व विजय शंकर यांनी केली होती.
अर्शदीप सिंगने यापूर्वी आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र, सुपर सिक्स फेरीत त्याने एक साधारण झेल सोडल्यानंतर भारतीय संघाला सामना गमवावा लागला होता. त्यावेळी अर्शदीप सिंगवर मोठ्या प्रमाणात टीका केली गेलेली. त्यानंतर अर्शदीपने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी20 मालिकेत वेदक गोलंदाजी करताना भारतीय संघाचे विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचमुळे त्याची विश्वचषक संघात निवड केली गेलेली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान वेगळाचं! भारतावर पडलायं भारी, एकदा आकडेवारी पाहाच
‘त्यांनी चांगली गोलंदाजी केली’, अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर त्यांच्या बॉलर्सचे बटलरकडून कौतुक