Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘त्यांनी चांगली गोलंदाजी केली’, अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर त्यांच्या बॉलर्सचे बटलरकडून कौतुक

October 22, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Jos-Buttler-On-Afghanistan-Defeat

Photo Courtesy: Twitter/englandcricket & ICC


टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीचा दुसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात पार पडला. हा सामना इंग्लंड संघाने 11 चेंडू शिल्लक ठेवत 5 विकेट्सने आपल्या नावावर केला. ही इंग्लंडची विश्वचषकातील विजयी सुरुवात ठरली. अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर भलताच आनंदी दिसला. या सामन्यानंतर त्याने महत्त्वाचे विधान केले. चला तर तो काय म्हणाला जाणून घेऊया…

‘इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप क्रिकेट खेळलो’
जोस बटलर (Jos Buttler) याने सामन्यानंतर म्हटले की, “आम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर क्रिकेट खेळलो आहोत. खूप अपेक्षा आहे. मैदानावर जाऊन विजय मिळवणे खूपच शानदार आहे.” यावेळी बटलर त्याने घेतलेल्या झेलाबद्दलही व्यक्त झाला. त्याच्या झेलाविषयी बोलताना तो म्हणाला की, “क्षेत्ररक्षण या खेळाचा महत्त्वाचा भाग आहे. क्षेत्ररक्षणात खूप चांगला प्रवास राहिला आहे.”

Victory to start our #T20WorldCup campaign! 💪

Next stop, Melbourne 🏟

Scorecard: https://t.co/g9Y8iaOHeT pic.twitter.com/6nTck6F8C6

— England Cricket (@englandcricket) October 22, 2022

सॅम करनच्या गोलंदाजीवर बटलरचे वक्तव्य
सॅम करन (Sam Curran) याने या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीविषयी बोलताना बटलर म्हणाला, “मला वाटते की, या भूमिकेसाठी तो खूप पात्र आहे. तो अतिरिक्त जबाबदारीसह चांगली कामगिरी करत आहे. तो कठीण क्षणांचा आनंद घेतो. अशा परिस्थितीत चेंडूची मागणी करणारी त्याची वृत्ती उत्तम आहे. सॅमबद्दल सर्वात सुखद बाब अशी की, त्याला नेहमीच गोलंदाजी करायची असते.”

What a performance, Sammy! 🖐

Scorecard: https://t.co/g9Y8ib5KgT#T20WorldCup | @CurranSM pic.twitter.com/Tz7MMwAuFf

— England Cricket (@englandcricket) October 22, 2022

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचे कौतुक
पुढे बटलरने अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजांचेही कौतुक केले. तो म्हणाला की, “अफगाणिस्तानकडे एक प्रभावशाली गोलंदाजी आक्रमण आहे. आम्हाला आव्हान देण्यात आले आणि आम्हाला गोलंदाजांचा सामना करावा लागला. सामन्यात आणखी वेगाने खेळले जाऊ शकत होते, परंतु मला वाटते की, अफगाणिस्तानने चांगली गोलंदाजी केली.”

सामन्याबद्दल थोडक्यात
विशेष म्हणजे, पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाचा डाव 112 धावांवर संपुष्टात आला. इब्राहिम जद्रान याने सर्वाधिक 32 धावांची खेळी केली. इंग्लंडसाठी सॅम करन याने शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले. त्याने 3.4 षटके गोलंदाजी करताना 10 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोन याने सर्वाधिक नाबाद 29 धावा चोपल्या. तसेच, इंग्लंडने या सामन्यात 5 विकेट्स गमावत 113 धावा केल्या आणि सामना आपल्या नावावर केला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
त्याने झेपही घेतली अन् तो पडलाही, पण कॅच मात्र सोडला नाही, पाहा बटलरचा अविश्वसनीय झेल
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेवॉन कॉनवेचा विश्वविक्रम, कुटल्या नाबाद 92 धावा


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC/BCCI

'त्या' चार चेंडूंनी बदलले पानटपरीवाल्याच्या मुलाचे नशीब, विश्वचषक तर जिंकून दिलाच शिवाय केली देशाची अशाप्रकारे सेवा

Photo Courtesy; Twitter/@BCCI

वाढदिवस विशेष - क्रिकेटर कर्ण शर्मा

Babar-Azam

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान वेगळाचं! भारतावर पडलायं भारी, एकदा आकडेवारी पाहाच

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143