Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विकेटकीपरऐवजी ऑलराऊडंर! दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला टी20 विश्वचषक संघात करावे लागले ‘हे’ बदल

विकेटकीपरऐवजी ऑलराऊडंर! दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला टी20 विश्वचषक संघात करावे लागले 'हे' बदल

October 20, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Green & Smith

Photo Courtesy: Twitter/ICC


यजमान ऑस्ट्रेलियाला टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) काही दिवसांपूर्वीच संघात फेरबदल करावे लागले आहे. राखीव विकेटकीपर-फलंदाज जोश इंग्लिस दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्याची जागा कोण घेणार अशा चर्चा केल्या जात आहेत. यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेटने त्याच्या बदली खेळाडूचे नाव जाहीर केले. 2022 च्या टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघात कॅमेरून ग्रीन याचा समावेश करण्यात आला आहे.

सिडनीमध्ये गोल्फ खेळताना जोश इंग्लिस ( Josh Inglis) याच्या हाताला दुखापत झाली. यामुळे टी-20 विश्वचषकाचा चॅम्पियन्स संघ या 27 वर्षीय खेळाडूसोबत कोणतीही जोखीम न घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याला त्यांच्या 15 खेळाडूंच्या संघातून काढून टाकले. त्याच्याजागी अष्टपैलू कॅमेरून ग्रीन (Cameron Green) याची संघात वर्णी लागली आहे. त्याची थेट मुख्य संघात निवड करण्यात आली असल्याने ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाने जेव्हा भारताचा दौरा केला होता, तेव्हा ग्रीन डेविड वॉर्नर याच्या जागेवर खेळला होता. त्यावेळी त्याने दोन अर्धशतके ठोकली होती. यामुळे त्याला संधी मिळाल्यास या स्पर्धेत हा उजव्या हाताच्या फलंदाज चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत 7 टी20 सामन्यात खेळताना 136 धावा केल्या असून 5 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच त्याने 14 कसोटी सामन्यात 723 धावा आणि 16 विकेट्स अशी कामगिरी केली आहे. 12 वनडे सामन्यात 270 धावा आणि 11 विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लिस हा एक सक्षम फलंदाज असताना, ऑस्ट्रेलियामध्ये त्याला मॅथ्यू वेड याचा बॅक-अप विकेटकीपर म्हणून निवडले होते. यामुळे जर वेड अनुपस्थित असला तरच त्याला खेळण्याची संधी मिळणार होती.

टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघ कट्टर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडशी भिडणार आहे. हा सामना 22 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघ : ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍश्टन एगर, पॅट कमिन्स, टीम डेविड, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेची सुपर 12मध्ये धमाकेदार एंट्री, पराभूत होऊनसुद्धा नेदरलॅंड्सच्या पुढच्या फेरीच्या आशा कायम
सचिनची विकेट गेल्यावर सेहवाग अंपायर शेजारी जाऊन बसला, असे काय घडले होते बेंगलोर कसोटीत?


Next Post
Photo Courtesy: Twitter/@ICC

अवघ्या तीन वर्षात क्रिकेटविश्वात आपला धाक जमवणारे 'ऍलन डोनाल्ड'

Anurag-Thakur

'भारताला कुणाचीही ऐकण्याची गरज नाही', क्रीडा मंत्र्यांचे पाकिस्तानच्या धमकीला सडेतोड प्रत्युत्तर

Suryakumar-Yadav

'स्पिनर आणि पेसर्सही त्याचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत', माजी भारतीयाचा सूर्यावर पूर्ण विश्वास

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143