Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीलंकेची सुपर 12मध्ये धमाकेदार एंट्री, पराभूत होऊनसुद्धा नेदरलॅंड्सच्या पुढच्या फेरीच्या आशा कायम

श्रीलंकेची सुपर 12मध्ये धमाकेदार एंट्री, पराभूत होऊनसुद्धा नेदरलॅंड्सच्या पुढच्या फेरीच्या आशा कायम

October 20, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आठव्या टी20 विश्वचषकात सध्या पहिल्या फेरीचे सामने सुरू आहेत. गुरूवारी (20 ऑक्टोबर) गट अ मध्ये श्रीलंका विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात सामना खेळला गेला. या स्पर्धेत आपले आव्हान टिकटून ठेवण्यासाठी श्रीलंकेला हा सामना जिंकणे अत्यावश्यक होते आणि झालेही तसेच. श्रीलंकेने नेदरलॅंड्सवर 16 धावांनी विजय मिळवला आणि सुपर 12चे तिकीट मिळवले आहे. यावेळी विजयाचा नायक ठरला कुसल मेंडिस आणि शेवटचे षटक टाकणारा लाहिरू कुमारा.

श्रीलंकेने दिलेल्या 163 लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजीसाठी उतरलेला नेदरलॅंड्सची सुरूवात स्थिर झाली, मात्र चौथ्याच षटकात महीश तीक्ष्कणा याने विक्रमजीत सिंग याला 7 धावावंर बाद केले. त्यानंतर काही अंतराने नेदरलॅंड्सच्या विकेट्स पडतच राहिल्या, तर सलामीवीर मॅक्स ओ दाउड एका बाजू लढवत राहिला. नेदरलॅंड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 15 चेंडूत 21 धावा करत संघाला 100च्या पार नेले. दाउडने 53 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. खालच्या फळीतील खेळाडूंनी थोडे फटकेबाजी केली, मात्र नेदरलॅंंड्सला 20 षटकात 9 विकेट्स गमावत 146 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली.

तत्पूर्वी, जिलाँग येथे सायमंड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पथुम निसांका(14) आणि धनंजया डी सिल्व्हा (0) हे लवकरत बाद झाले. त्यामुळे श्रीलंकेचा संघ थोडा अडचणीत आला होता. त्यानंतर सलामीवीर कुसल मेंडिस खेळपट्टीवर तग धरून राहिला. त्याने चरिथ असालंका याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 45 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. असालंका 31 धावा करत बाद झाला.

यावेळी मेंडिसने 179.54च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना पाच चौकार आणि पाच षटकार मारले. त्याने 44 चेंडूत 79 धावा केल्या. त्याचे हे आंतरराष्ट्रीय टी20मधील 9वे अर्धशतक ठरले. त्याने भानुका राजपक्षे याच्यासोबत 19 चेंडूत 34 धावांची भागीदारी केली.

Magical Mendis!

We can reveal that this 6 from Kusal Mendis is one of the moments that could be featured in your @0xFanCraze Crictos of the Game packs from Netherlands v Sri Lanka. Grab your pack from https://t.co/8TpUHbQQaa to own iconic moments from every game. pic.twitter.com/wmHcxgabBA

— ICC (@ICC) October 20, 2022

नेदरलॅंड्सला शेवटच्या 5 षटकात 61 धावांची आवश्यकता
नेदरलॅंड्सच्या डावातील शेवटच्या पाच षटकात सामना कधी नेदरलॅंड्स तर कधी श्रीलंकेच्या बाजूने झुकत होता. कारण धावा तर बनत होत्या त्याचबरोबर विकेट्सही जात होत्या.

श्रीलंकेचा गोलंदाज वानिंदू हसरंगा याने 4 षटकात 28 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यातील शेवटचे षटक महत्वाचे ठरले. कारण नेदरलॅंड्सच्या 19व्या षटकात 16 धावा वसूल केल्या होत्या म्हणून त्यांना विजयासाठी 6 चेंडूत 23 धावांंची गरज होती. तेव्हा लाहिरू कुमारा हा शेवटचे षटक टाकण्यास आला. त्याने केवळ 6 धावा दिल्याने श्रीलंकेचा विजय पक्का झाला. त्याने 4 षटकात 28 धावा देत एक विकेट घेतली.

सुपर 12मध्ये पोहोचण्याची नेदरलॅंड्सला संधी
नेदरलॅंड्स आणि श्रीलंका संघाने प्रत्येकी तीन सामने खेळले असून त्यांचे 4 गुण झाले आहेत. यामध्ये श्रीलंकेचा रनरेट उत्तम असल्याने ते पहिल्या स्थानावर आहेत. तसेच त्यांचा सुपर 12मध्ये प्रवेश झाला आहे. त्यानंतर नामिबियाचे 2 सामन्यात 2 आणि युएईने 2 सामने खेळले असून त्यांना एकही गुण मिळाला नाही. यामुळे नामिबियाचा नेट रनरेट नेदरलॅंड्सच्या तुलनेत चांगला आहे. त्यातच आजचा (20 ऑक्टोबर) दुसरा सामना नामिबिया विरुद्ध युएई यांच्यात सुरू आहे. यामध्ये नामिबिया पराभूत झाला तर नेदरलॅंड्सचे सुपर 12 मध्ये जाणे पक्के आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विकेटकीपरऐवजी ऑलराऊडंर! दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला टी20 विश्वचषक संघात करावे लागले ‘हे’ बदल
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!


Next Post
Green & Smith

विकेटकीपरऐवजी ऑलराऊडंर! दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला टी20 विश्वचषक संघात करावे लागले 'हे' बदल

Photo Courtesy: Twitter/@ICC

अवघ्या तीन वर्षात क्रिकेटविश्वात आपला धाक जमवणारे 'ऍलन डोनाल्ड'

Anurag-Thakur

'भारताला कुणाचीही ऐकण्याची गरज नाही', क्रीडा मंत्र्यांचे पाकिस्तानच्या धमकीला सडेतोड प्रत्युत्तर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143