मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत विक्रमांचा ढीग रचला आहे. त्याचे अनेक असे विक्रम आहे, जे कोणत्याही फलंदाजाने मोडणे अशक्य आहे. सचिनच्या विक्रमांपैकी एक असाच एक विक्रम म्हणजे, त्याचा २०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम.
सचिनने जरी त्याच्या कसोटी कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळले असले, तरी तो फक्त एकदा यष्टीचीत झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, तो स्वत: नाही तर नॉन स्टायकर बाजूला असणाऱ्या विरेंद्र सेहवागमुळे यष्टीचीत झाला होता. आपल्या चुकीमुळे सचिनची विकेट गेली म्हणून सेहवाग खूप घाबरला होता. या गोष्टीचा सेहवागने तब्बल १६ वर्षांनंतर एका चॅनलच्या लाइव्ह शोमध्ये खुलासा केला होता. सेहवाग आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म २० ऑक्टोबर १९७८ रोजी दिल्ली येथे झाला होता. Sachin Tendulkar Stump Out First Time In Test Due To Virender Sehwag.
ती घटना घडली होती २००१मध्ये. त्यावेळी इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता आणि दोन्ही संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात सचिन आणि सेहवाग फलंदाजी करत होते. सेहवाग फटकेबाजी करत चौकारांवर चौकार मारत होता. तर, सचिन मात्र खूप वेळापासून ९० धावांवरच अडकला होता. इंग्लंडचा गोलंदाज ऍशले जाइल्स सामन्यातील ७३वे षटक टाकण्यासाठी आला होता.
याविषयी बोलताना सेहवाग म्हणाला, “जेव्हा सचिन खूप वेळापासून धावा घेऊ शकत नव्हता, तेव्हा मला राहावले नाही आणि सचिन पाजीकडे जाऊन त्याला म्हणालो, पाजी चेंडू स्पिन होत नाहीये. मग तू स्टेप आउट करुन का शॉट मारत नाही. एकदा जर तू शॉट मारलास तर खेळायला सोपे जाईल. मला पाजीला पुढे येऊन खेळण्यासाठी तयार करायला २-३ षटके लागली. परंतु हे सचिनचे दुर्भाग्य होते की, ज्या चेंडूवर त्याने पुढे येऊन शॉट मारायचा प्रयत्न केला. तोच चेंडू स्पिन झाला आणि पाजी यष्टीचीत झाले. हे पाहताच मी माझे तोंड दुसऱ्या बाजूला केले.”
“त्यानंतर टी ब्रेक झाला होता. बेंगलोरच्या स्टेडियममध्ये ड्रेसिंग रूम वरती आहेत. पण, मी ड्रेसिंग रुममध्ये गेलोच नाही. खाली पंचांच्या खोलीत बसून राहिलो. जेव्हा मला येऊन सांगण्यात आले की, वरती जा तुला मार पडणार नाही, तेव्हा मी वरती गेलो होतो.”
त्या सामन्यात सेहवागने ६६ धावा केल्या होत्या. तो सामना अनिर्णित राहिला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी ‘या’ भारतीय खेळाडूने काढल्या खास आठवणी! म्हणाला, ‘…खरचं अंगावर शहारे आले होते’
मराठीत माहिती- क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू
HBD विरू: तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’