मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणतात. सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक मोठी विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आपल्या जबरदस्त फलंदाजीने त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत.
वनडेमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकेही केली आहेत. याशिवाय दोन्ही स्वरूपात मिळून १०० शतके करणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. कसोटी आणि वनडे सामन्यातही सचिनने सर्वाधिक धावाही केल्या आहेत. तसेच वनडे सामन्यात पहिले दुहेरी शतक झळकावण्याचा विक्रमही त्यानेच नोंदविला गेला आहे. आतापर्यंत अनेक फलंदाजांनी वनडेमध्ये दुहेरी शतके ठोकली आहेत, पण हा पराक्रम करणारा पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर होता.
असे क्रिकेटमधील अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. तसेच त्याने फलंदाजीशिवाय बऱ्याच सामन्यात गोलंदाज म्हणूनही कामगिरी बजावली. या लेखात तुम्हाला वनडे क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरच्या अशाच दोन विक्रमाबद्दल सांगणार आहोत, जे त्याने गोलंदाजी करताना केले आहेत.
सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत गोलंदाजीतील २ आश्चर्यकारक विक्रम –
१. वनडे सामन्याच्या शेवटच्या षटकात यशस्वीरित्या ६ किंवा त्यापेक्षा कमी धावांचे रक्षण
क्रिकेटमध्ये टी-२० प्रकार आल्यापासून फलंदाजांकडे आता अखेरच्या काही षटकांत १० पेक्षा जास्त धावांच्या सरासरीने धावा करण्याची क्षमता आहे, असे आतापर्यंत अनेक सामने झाले. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे वनडे क्रिकेट सामन्याच्या शेवटच्या षटकात सचिनने ६ किंवा त्यापेक्षा कमी धावांचा यशस्वीपणे बचाव करणारी गोलंदाजी २ वेळा केली आणि असे करणारा तो एकमेव गोलंदाज आहे.
सचिन तेंडुलकरने हा पराक्रम दक्षिण आफ्रिकेविरूद्ध १९९३ मधील हिरो चषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात आणि त्यानंतर १९९६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध केला होता. निश्चितच हा एक विक्रम आहे.
२. सचिनने वनडे सामन्यात शेन वॉर्नपेक्षा जास्त वेळा ५ बळी घेतले आहेत
शेन वॉर्न हा क्रिकेट जगातील एक महान फिरकीपटू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ७०० पेक्षा जास्त बळी आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीतील अनेक सामने त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर जिंकले. त्याने बरीच मोठी विक्रम नोंदविले पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वनडे गोलंदाजीच्या बाबतीत सचिन तेंडुलकरने शेन वॉर्नला मागे टाकले आहे.
खरं तर सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये दोनदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध त्याने हा पराक्रम केला, तर महान कसोटी क्रिकेट गोलंदाज शेन वॉर्नला वनडेमध्ये केवळ एकदाच पाच विकेट घेता आले. हा एक सचिनच्या नावावर असणारा गोलंदाजीत दुसरा मोठा विक्रम आहे.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून फक्त १ सामना खेळणारे ३ भारतीय खेळाडू
वाढदिवस विशेष : क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्दाची परिभाषा बदलणारा लान्स क्लुसनर
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामने खेळणारे २ भारतीय दिग्गज
महत्त्वाच्या बातम्या –
पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं
आयसीसी टी-२० क्रमवारी: डेव्हिड मलान पहिल्या ५ मध्ये परतला, हाफिजलाही झाला फायदा
आयपीएल २०२०: सर्व संघांना दिले गेले ब्लूटूथ सक्षम बॅज; सर्व डेटा जाणार बीसीसीआयकडे