Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेवॉन कॉनवेचा विश्वविक्रम, कुटल्या नाबाद 92 धावा 

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेवॉन कॉनवेचा विश्वविक्रम, कुटल्या नाबाद 92 धावा 

October 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
devon conway

Photo Courtesy: Twitter/BLACKCAPS


टी20 विश्वचषक 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड हा सामना शनिवारी (22 ऑक्टोबर) सिडनी येथील एससीजी मैदानावर खेळला गेला. ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फँच याने नाणेफेक जिंकूण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून मैदानात उतरलेल्या सलामीवीर फलंदाजांनी धडाकेबाज सुरूवात केली. डेवॉन कॉनवे आणि फिन ऍलन यांनी सुरेख फटकेबाजी करत पॉवरप्लेमध्ये 65 धावा केल्या. फिन ऍलन 16 चेंडूत 42 धावा करून बाद झाल्यानंतर डेवॉन कॉनवेने धावगती संथ पडू दिली नाही. बिनधास्त फलंदाजीच्या जोरावर त्याने न्यूझीलंड संघासाठी ‘विजयश्री’ खेचून आणली. कॉनवेच्या या खेळीची नोंद एका खास विश्वविक्रमाच्या यादीत घेतली गेली आहे.

डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने यजमान ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. कॉनवेने एकूण 58 चेंडू खेळले आणि 158.62 च्या स्ट्राइक रेटने 92 धावा केल्या. या धावा त्याने 7 चौकार आणि 2 उत्तुंग षटकाराच्या मदतीने केल्या. ऑस्ट्रेलियन संघ मागच्या टी-20 विश्वचषका विजेता राहिला असून कॉनवे गतविजेत्या संघाविरुद्ध सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे.

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात गतविजेत्या संघाविरुद्ध सर्वात मोठी खेळी करणाऱ्यांच्या यादीत डेवॉन कॉनवे आता पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्याने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नाबाद 92 धावा केल्या आणि हा विश्वविक्रम देखील नावावर केला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याच्या नावावर होता. वेस्ट इंडीज मागच्या टी-20 विश्वचषकात गतविजेत्या संघाच्या भूमिकेत होता आणि वॉर्नरने त्यांच्याविरुद्ध नाबाद 89 धावा केल्या होत्या.

2016 साली खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात श्रीलंका गतविजेत्यांच्या भूमिकेत होता आणि त्यांच्याविरुद्ध खेळलेल्या एका सामन्यात वेस्ट इंडीजच्या आंद्रे फ्लेचरने (Andre Fletcher) नाबाद 84 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर फ्लेचर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यादीत चौथ्या क्रमांकावर जॉन्सन चार्ल्स (Johnson Charles) आहे. ज्याने टी-20 विश्वचषक 2012 मध्ये गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध 84 धावा कुटल्या होत्या. यादीत पाचवा क्रमांक ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉटसन (Shane Watson) याचा आहे. वॉटसनने 2010 सालच्या टी-20 विश्वचषकात गतविजेत्या पाकिस्तानसोबत खेळताना 81 धावा कुटल्या होत्या.

From start to finish 🙌

Devon Conway stunning innings of 92* fetches him the @aramco Player of the Match 👏#T20WorldCup pic.twitter.com/rTdJmXzRkk

— T20 World Cup (@T20WorldCup) October 22, 2022

टी-20 विश्वचषकात गतविजेत्या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
92* – डेवॉन कॉनवे (न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया) – 2022
89* – डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज) – 2021
84* – आंद्रे फ्लेचर (वेस्ट इंडीज विरुद्ध श्रीलंका) – 2016
84 – जॉनसन चार्ल्स (वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड) – 2012
81 – शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान) – 2010

 


Next Post
babar azam

IND vs PAK | पावसाच्या प्रश्नावर बाबर आझमचे भन्नाट उत्तर, 'नाही सर, आम्ही...'

Photo Courtesy: Twitter/Pro Kabaddi

प्रो कबड्डी: मुंबईचा धसमुसळ्या खेळाने मानहानीकारक पराभव; जयपूरने उडवली टायटन्सची दाणादाण

file photo

19 वर्षाखालील मुलींच्या टी-20 लीग संघाच्या निवड चाचणी प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करावी -स्वप्नील मोडक

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143