रशियामध्ये सुरु असलेल्या 21 व्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (15 जुलै) होणार आहे.
इंग्लंडमधील फुटबॉल चाहत्यांनी या फुटबॉल विश्वचषकाचे विजेतेपद मिळवल्यास 16 जुलैला इंग्लंडमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहिर करावी यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे.
इंग्लंड सरकाच्या संकेतस्थळानुसार जवळपास एक लाख ऐंशी हजार लोकांनी या स्वाक्षरी मोहीमेद्वारे ही मागणी केली आहे.
यामध्ये जर आणखी एक लाख लोकांनी सहीद्वारे सहभाग नोंदवल्यास हा मुद्दा संसदेत चर्चेसाठी घेतला जाणार आहे.
इंग्लडच्या फुटबॉल चाहत्यांनी केलेल्या या मागणीला इंग्लडच्या संसदेचे विरोधी पक्ष नेते जेरमी कॉब्रीन यांनी पाठींबा दिला आहे.
इंग्लंड फुटबॉल संघाने 1990 नंतर प्रथमच रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
यापूर्वी इंग्लंडने 1966 साली प्रथम आणि एकमेव विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर इंग्लंडला विश्वविजेते पदाची चव चाखता आली नाही.
बुधवारी (11 जुलै) फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी क्रोएशिया विरुद्ध लढणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-गुहेतून सुटका झालेल्या १२ मुलांना फिफाने दिले विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्याचे निमंत्रण
-रोनाल्डोचा रियल मॅद्रिदला अखेर रामराम, फुटबाॅल विश्वात २१ व्या शतकातील सर्वात मोठी ट्रांस्फर