शुक्रवारी (६ जुलै) फिफा विश्वचषकाच्या पहिल्या उपांंत्यपूर्व सामन्यात बलाढ्य फ्रान्सने उरुग्वेचा २-० असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
फिफा विश्वचषकाच्या या पहिल्या उपांत्य पूर्व सामन्यात फ्रान्सने एकहाती वर्चस्व राखले.
पहिल्या हाफमध्ये ४१ व्या मिनिटाला फ्रि किकवर अॅटोनियो ग्रीझमनने दिलेल्या पासवर हेडद्वारे गोल करत राफेल वॅरनने फ्रान्सला खाते उघडून दिले.
समन्याच्या सुरवाती पासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या फ्रान्सने उरुग्वेला सामन्यात गोल करण्याची एकही संधी दिली नाही.
फ्रान्सने पहिला गोल नोंदवील्यानंतर उरुग्वेकडे सुद्धा गोल करण्याची संधी चालून आली होती. मात्र उरुग्वेच्या मार्टीन क्रिसरने गोलपोस्टवर मारलेला फटका फ्रान्सचा ह्युगो लॉरीसने अप्रतिमरीत्या तटवत फ्रान्सची १-० अशी आघाडी कायम राखली.
दुसऱ्या हाफमध्ये ६१ व्या मिनिटाला फ्रान्सच्या अॅटोनियो ग्रीझमनने गोल करत उरुग्वेवर २-० अशी आघाडी वाढवली.
जागतीक फुटबॉलमध्ये उरुग्वेची बचावफळी सर्वोत्कृष्ठ मानली जाते. मात्र कालच्या सामन्यात उरुग्वेच्या बचावफळीचा फ्रान्ससमोर निभाव लागला नाही.
या विजयाबरोबरच फ्रान्सने २००६ च्या विश्वचषकानंतर प्रथमच उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.
उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना आता मंगळवारी (१० जुलै) बेल्जिअमशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
फिफा विश्वचषक: सामना सुरु व्हायला काही तास बाकी असतानाच…
नेमार टीकेचा धनी; विश्वचषकात एकच चूक केली तब्बल ३ वेळा