भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला आयसीसीच्या वनडे विश्वचषक २०२३ चे यजमानपद देण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी बोर्ड पूर्ण तयारी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. १० संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असून नोव्हेंबर महिन्यात संपेल. ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा कोणता विश्वचषक पूर्णपणे भारतात आयोजला जाईल. तत्पूर्वी या विश्वचषकात क्रिकेट चाहत्यांना विश्वस्तरीय अनुभव देण्याचा दावा बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी केला आहे.
यापूर्वीही भारताने आयसीसी स्पर्धांचे यजमानपद भूषवले आहे. वर्ष १९८७, १९९६ आणि २०२२ मध्ये संयुक्तपणे पाकिस्तान, श्रीलंका आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डांनी विश्वचषकाचे यजमानपद सांभाळले होते. मात्र २०२३ सालच्या वनडे विश्वचषकाचे आयोजन एकट्या भारतात केले जाणार आहे.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ याला भारतातील क्रिकेटच्या स्थितीत आणखी सुधारणा करण्याची मोठी संधी म्हणून पाहात आहेत. या विश्वचषकातील सामने खेळवले जाणाऱ्या ठिकाणांना अंतिम रूप देणे अजून बाकी आहे. त्यामुळे विश्वचषकावेळी दर्शकांना बऱ्याचशा ठिकाणी विश्वस्तरीय सुविधांचा अनुभव घ्यायला मिळेल, असे आश्वासन धुमाळ यांनी दिले आहे.
एका नामांकित पत्रकाराशी याबद्दल बोलताना धुमाळ म्हणाले की, “होय. भारतात विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी आमच्यापुढे काही आव्हाने आहेत. आम्ही एक वर्षाआधीच वेळापत्रक बनवू, इतक्या योजना आखण्यात सक्षम नाही. कधी-कधी हवामानामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सामन्याचे ठिकाण हलवणे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये शक्य आहे. परंतु भारतात असे करणे शक्य नाही.”
“कधी-कधी ही आव्हाने पुढे येत राहतात. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आम्ही या आव्हानांवर मात करू शकू. तसेच दर्शकांना, मग ते स्टेडियममध्ये येऊन प्रत्यक्षात सामना पाहणारे दर्शक असो वा टीव्हीवर सामन्यांचा आनंद लुटणारे दर्शक असो, त्यांना अपेक्षित अनुभव देण्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. आम्ही सुनिश्चित करत आहोत की, येता विश्वचषक प्रेक्षकांना अविश्वसनीय अनुभव देऊन जाईल. मी तुम्हाला दावा करून सांगतो की, आगामी विश्वचषकात तुम्हाला फरक जाणवेल,” असे धुमाळ शेवटी म्हणाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बहुत पुराना याराना! सुट्टी मिळताच हार्दिक पोहोचला पोलार्डच्या घरी पाहुणचार घ्यायला
विराटला सतत विश्रांती देण्यावरून भडकला भारतीय दिग्गज; म्हणाला, “त्याने आता सरळ…”
आशिया कपचे आयोजनस्थळ बदलूनही श्रीलंका क्रिकेट बोर्ड कमावणार रग्गड पैसा






