शतक झळकावणे ही प्रत्येक क्रिकेटपटूसाठी मोठी गोष्ट असते. टी20 या वेगवान क्रिकेट प्रकारात तर शतक झळकावणे म्हणजे अगदी सोपे असल्याचे अनेक खेळाडूंनी दाखवून दिले आहे. अनेक टी20 सामन्यात असे पाहायला मिळत आहे. अशात आयपीएल 2023 स्पर्धेनंतर सुरू झालेल्या तमिळनाडू प्रीमिअर लीगमध्येही याचा प्रत्यय आला आहे. या स्पर्धेतही चौकार-षटकारांची बरसात होत आहे. आतापर्यंत स्पर्धेतील 15 सामने पार पडले आहेत. यातील एका सामन्यात नेल्लई रॉयल किंग्सच्या शतक झळकावत इतिहासच रचला आहे. चला तर, त्या खेळाडूच्या कामगिरीविषयी जाणून घेऊयात.
लीगच्या या हंगामातील दुसरे शतक नेल्लई रॉयल किंग्स विरुद्ध चेपॉक सुपर गिलीज (Nellai Royal Kings vs Chepauk Super Gillies) संघात खेळल्या गेलेल्या 14व्या सामन्यात आले. किंग्सचा कर्णधार अरुण कार्तिक (Arun Karthik) याने 61 चेंडूत नाबाद 104 धावांची नाबाद शतकी खेळी साकारून संघाला विजयी केले.
या शतकासोबत अरुण कार्तिक याने तमिळनाडू प्रीमिअर लीग 2023 (Tamilnadu Premier League 2023) स्पर्धेत इतिहास रचला आहे. तो लीगमध्ये तीन शतके झळकावणारा पहिला फलंदाज बनला आहे. अरुणने टीएनपीएल (TNPL) स्पर्धेतील पहिले शतक 2019मध्ये झळकावले होते. त्यावेळी त्याने 61 चेंडूत 106 धावा केल्या होत्या. त्यानंतर 3 वर्षांनंतर त्याने 2022मध्ये 57 चेंडूत 106 दावांची खेळी साकारली होती. यानंतर आता टीएनपीएल 2023मध्ये 37 वर्षीय अरुणने 61 चेंडूत नाबाद 104 धावा चोपल्या.
कर्णधारांची हवा टाईट
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर चेपॉक सुपर गिलीज संघाचा कर्णधार बाबा अपराजित याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी अपराजितने 79 धावांची खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त चेपॉकचा कोणताही खेळाडू मोठी खेळी साकारू शकला नाही. चेपॉक संघाने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 159 धावा केल्या. यावेळी किंग्सपुढे 160 धावांचे आव्हान होते. एका संघाच्या कर्णधाराला दुसऱ्या संघाच्या कर्णधाराने सडेतोड प्रत्युत्तर दिले.
अरुण कार्तिकचे वादळी शतक
चेपॉक सुपर गिलीजचा कर्णधार बाबा अपराजितच्या 79 धावांच्या खेळीचे प्रत्युत्तर किंग्स संघाचा कर्णधार अरुण कार्तिकने 61 चेंडूत नाबाद 104 धावा चोपत दिले. त्याने या खेळीत 5 षटकार आणि 10 चौकारांचाही पाऊस पाडला. कार्तिक 98 धावांवर असताना त्याने डावातील 5वा षटकार खेचला. या षटकारासह त्याने शतक पूर्ण केलेच, पण सामनाही खिशात घातला. किंग्सने 7 चेंडू शिल्लक ठेवत 8 विकेट्सने हा सामना आपल्या नावावर केला. (cricketer arun karthik became first batsman to scored 3 centuries in tnpl chepauk super gillies vs nellai royal kings)
महत्वाच्या बातम्या-
बुमराहच्या पुनरागमनावर शास्त्रींची चेतावणी; आफ्रिदीचे उदाहरण देत म्हणाले, ‘तुम्ही त्याला 4 महिने…’
आता बास झालं! निवडकर्त्यांनी पुन्हा दुर्लक्ष करताच सरफराजने तोडले मौन, थेट इंस्टाग्रामवरून साधला निशाणा