पुणे: पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने एल्व्हन स्टार बारामती 15 संघाचा तर आर्य स्पोर्ट शिवसैनिक संघाने कॅम्प बॉईज् संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
लेजेन्डस् क्रिकेट क्लब, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत स्वप्निल सातवच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने एल्व्हन स्टार बारामती 15 संघाचा 5 गडी राखून सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना राहुल सातव व नदिम अन्सारी यांच्या अचूक गोलंदाजीने एल्व्हन स्टार बारामती 15 संघाचा डाव 6 षटकात 4 बाद 52 धावांत रोखला. 52 धावांचे लक्ष स्वप्निल सातव, राहुल सातव व उमेश कत्रे यांच्या प्रत्येकी 11 धावांच्या बळावर पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने 5.3 षटकात 5 बाद 53 धावा करून पुर्ण करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत वौभव पांडूलेच्या नाबाद 22 धावांच्या बळावर आर्य स्पोर्ट शिवसैनिक संघाने कॅम्प बॉईज् संंघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. नाबाद 22 धावा करणारा वौभव पांडूले सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी
एल्व्हन स्टार बारामती 15- 6 षटकात 4 बाद 52 धावा(इमरान पठान 12, दिपक कुदळे 11, अभिजीत एकशिंगे 11, राहुल सातव 2-10, नदिम अन्सारी 2-21) पराभूत वि पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली- 5.3 षटकात 5 बाद 53 धावा(स्वप्निल सातव 11, राहुल सातव 11, उमेश कत्रे 11, मोईन भागवत 1-19, अभिजीत एकशिंगे 2-15, प्रविण भोसले 1-14) सामनावीर- स्वप्निल सातव
पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.
कॅम्प बॉईज्- 6 षटकात 3 बाद 50 धावा(शरद संघेला 23, प्रशांत चौधरी 1-10, निळकंठ पवार 1-21, सौरभ दोडके 1-12) पराभूत वि आर्य स्पोर्ट शिवसैनिक- 3.5 षटकत 1 बाद 52 धावा(वौभव पांडूले नाबाद 22, राजेंद्र पानेसर नाबाद 16, अफजल मकदुम 1-15) सामनावीर- वौभव पांडूले
आर्य स्पोर्ट शिवसैनिक संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.