पुणे, 25 जून: हॉकी पुणे लीग 2024-25 च्या वरिष्ठ विभागीय गटात मंगळवारी मध्य रेल्वे आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) यांच्यातील तब्बल 11 गोलांची नोंद झाली. त्यात रेल्वेने प्रतिस्पर्ध्यांवर 6-5 अशी मात केली.
नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत दिवसातील शेवटच्या सामन्यात राज पाटीलने (13व्या) एफसीआयचे खाते उघडले. त्यानंतर तीन गोल करताना मध्य रेल्वेने आघाडी घेतली. विशाल पिल्ले (25वे – पीसी), प्रज्वल मोरकर (28वे – पीसी) आणि स्टीफन स्वामी (30वे) यांचे त्यात मोलाचे योगदान राहिले.
आकाश पवार (31वा), मनप्रीत सिंगच्या (33वा) गोलमुळे एफसीआयने दमदार पुनरागमन करताना 3-3 अशी बरोबरी साधली. त्यानंतर मध्य रेल्वेकडून अनिकेत मुथिया (36वे), विशाल पिल्ले (41वे) आणि स्टीफन स्वामीने (36वे) गोल करताना टीमला 6-3 अशी आघाडी मिळवून दिली.
अजय नायडू (48वे – पीसी), आकाश पवारने (49वे) एक-एक गोल करताना सामन्यातील रंगत कायम राखली. मात्र, पराभव टाळण्यात त्यांना अपयश आले.
कनिष्ठ विभागात हॉकी लव्हर्स अकॅडमीने पीसीएमसी अकॅडमीचा 5-1 असा पराभव केला. हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लबने पुणे मॅजिशियन्सला 11-0 अशा फरकाने पराभूत केले.
निकाल –
कनिष्ठ विभाग
अ-गट: हॉकी लव्हर्स अकॅडमी: 5 (साहिल सपकाळ 3रा; संग्राम पोळेकर 14वा; केतन भामणे 32वा; अमित राजपूत 43वा; निर्मल सैनी 51वा) विजयी वि. पीसीएमसी अॅकॅडमी:1 (नुमेर शेख 53वा). हाफटाइम: 2-0
ब गट: हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लब: 11(आकाश बेलीटकर 8वा – पीसी, 11वा, 40वा, 49वा; सिद्धार्थ निमकर 23वा; हितेश कल्याणा 41वा, 45वा – पीसी, 51वा, 55वा; हिमांशू गरसुंद 58वा, पीसी; हृषिकेश बेतेलू 59वा); विजयी वि. पुणे मॅजिशियन्स:0. हाफटाईम: 3-0
वरिष्ठ विभाग:
मध्य रेल्वे, पुणे: 6(विशाल पिल्ले 25वे – पीसी., 41वे – पीसी; प्रज्वल मोरकर 28वे – पीसी; स्टीफन स्वामी 30वे, 46वे – पीसी; अनिकेत मुथिया 36वे) विजयी वि. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पुणे: 5(राज पाटील 13वे; आकाश पवार 31वे, 49वे; मनप्रीत सिंग 33वे-पीसी; अजय नायडू 48वे – पीसी). हाफटाईम: 3-0