कोलकता| आज आयपीएल 2018 चा 13 वा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात होत आहे. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यामूळे प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकता नाईट रायडर्सने २० षटकांत ७ बाद १९७ धावा केल्या. त्यात ख्रिस लीनच्या ७४ धावांचा समावेश आहे.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ख्रिस गेल आणि केएल राहूलने पंजाबला जबरदस्त सुरूवात करून दिली. गेलने २७ चेंडूत नाबाद ४९ तर राहूलने २३ चेंडूत ४६ धावा केल्या आहेत.
परंतू पाऊस आल्यामूळे हा सामना थांबवण्यात आला आहे. हा सामना जर पावसामुळे पुढे खेळवला गेला नाही तर पंजाब संघाला ३१ धावांनी विजय मिळू शकतो.
कारण डकवर्थ लुईस नियमाने ८.२ षटकांत पंजाबला बिनबाद ६५ धावा करायच्या होत्या परंतू त्यांनी तेवढ्याच षटकांत ९६ धावा केल्या आहेत.
गेल वादळाचा तिसरा तडाखा @KKRiders ला. २७ चेंडूतच केल्या नाबाद ४९ धावा. विराटकडून आॅरेंज कॅपही घेतली. #म #मराठी #IPL #IPL2018
— Sharad Bodage (@SharadBodage) April 21, 2018