आयपीएल 2024 ची सुरुवात 22 मार्चपासून होत आहे. तसेच पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये होणार आहे. पण त्याआधी सीएसकेने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कारण आयपीएल सुरु होण्याच्या एक दिवस आधी सीएसकेने कर्णधार बदलला आहे. एमएस धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. यानंतर विराट कोहलीची जुनी प्रतिक्रिया सध्या तुफान व्हायरल होत आहे.
याबरोबरच “पिवळ्या जर्सीतील दिग्गज कर्णधारपदाचा कार्यकाळ… पण हा अध्याय चाहते कधीही विसरणार नाही. धोनीबाबत कायमच आदर आहे.”, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने 24 मार्च 2022 रोजी दिली होती. त्यानंतर आता हे जुनं ट्वीट व्हायरल होत आहे. दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनी-विराट कोहली आणि रोहित शर्मा कर्णधारपद भूषवणार नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चाहत्यांनी हे पर्व दिग्गज खेळाडूंचं शेवटचं पर्व असल्याचं म्हंटलं आहे.
तसेच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील इंन्स्टा स्टोरी टाकून धोनी बद्दल आदर व्यक्त केला आहे. तसेच महेंद्रसिंह धोनीने प्रमाणेच रोहित शर्मा देखील आयपीएल इतिहातील सर्वाधीक ट्रॉफी जिंकणार कर्णधार आहे. अशातच आयपीएलच्या 17व्या हंगामात रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी कर्णधार नसून ते फक्त एक खेळाडू म्हणून या हंगामात खेळताना दिसणार आहेत. यामुळे एकंदरीत काहीही असलं तर धोनीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
https://twitter.com/imVkohli/status/1506991827764752387
दरम्यान, रवींद्र जडेजा नंतर आता संघाने ऋतुराज गायकवाडकडे जबाबदारी दिली आहे. कदाचित संघाने भविष्याचा विचार करुन हा निर्णय घेतला असेल. पण आता कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तो कशी कामगिरी करतो यावर सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ पुढीलप्रमाणे : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनेर, एन सिमरंत, एन. सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली. जखमी/माघार घेतलेले खेळाडू: डेव्हॉन कॉनवे, मथीशा पाथिराना.
महत्त्वाच्या बातम्या-