इंडियन प्रीमियर लीग 2024च्या लिलावाआधी खूप सारा ड्रामा पाहायला मिळाला. रविवारी (26 नोव्हेंबर) सर्व आयपीएल फ्रँचायझींना आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची होती. हार्दिक पंड्या याला गुजरात टायटन्सने रिटेन केले होते. पण यादी घोषित झाल्यानंतर अवघ्या काहीच तासात हार्दिकने मुंबई इंडियन्स संघाचा हात पकडला. शुबमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार बनला असून त्याने हार्दिक पंड्यावर निशाणा साधला आहे.
आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ पहिल्यांदा या स्पर्धेत सहभागी झाला. पहिल्याच हंगामात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला त्यांना खरेदी केले आणि संघाचा कर्णधार बनवले. हार्दिकनेही आपल्या नेतृत्वात गुजरातला पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद मिळवून दिले. मागच्या वर्षीही गुजरात टायटन्स हार्दिकच्या नेतृत्वात आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. असे असले तरी, आयपीएळ 2024 पूर्वी हार्दिकने ऐन वेळी गुजरातची साथ सोडली. चाहत्यांसह संघ व्यवस्थापनासाठीही हार्दिकचा हा निर्मय धक्कादायक असू शकतो. याच पार्श्वभूमीवर शुबमन गिल (Shubman Gill) याचा नवा व्हिडिओ व्हयरल होत आहे.
गुजरात टायटन्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल () याची प्रतिक्रिया चाहत्यांपर्यंत पोहोचवली गेली आहे. व्हिडिओत गिल म्हणत आहे की, “हा खूप छान अनुभव (कर्णधारपदाचा अनुभव) आहे. मी सात-आठ वर्षांचा असताना आयपीएल सुरू झाली होती. मला वाटते प्रत्येक लहान मुलगा ज्याला क्रिकेटपटू बनलायचे आहे, त्याला आयपीएल खेळायची असते. त्याला आपल्या संघाचे कर्णधारपद सांभाळायचे असते.”
???? From a dreamy eyed fanboy of the IPL to a captain of the Gujarat Titans! Aapdo Shubman is raring to own his latest designation! Hear his first words from a brand new chapter… ????#TitansFAM, ready for a new era of leadership? ????#AavaDe pic.twitter.com/vmIN7I4LQY
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 29, 2023
“संघातील एकजूट पाहून खूप चांगले वाटते. आपल्या सर्वांना माहीत आहे की, कर्णधारपदासोबत इतर बऱ्याच गोष्टी येतात. बांधिलकी त्यापैकी एक आहे. शिस्त, परिश्रम आणि याचसोबत निष्ठा याही गोष्टी महत्वाच्या आहेत. मी महान लिडर्सच्या मार्गदर्शनात खेळलो, असे मला वाटते. त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मला वाटते या अनुभवाचा मला फायदा होईल. आमच्या संघात केन विलियम्सन, राशिद खान, मोहम्मद शमी असे माहन लिडर्स आहेत. डेविड मिलर आहे आणि रिद्धिमान साहा देखील संघाचा भाग आहेत. या शुभ सुरुवातीसाठी मला तुम्हा सर्वांची साथ हवी आहे,” असेही गिल शेवटी म्हणाला.
Bodied pandya pic.twitter.com/Xg3U7I3zL4
— Pushkar (@musafir_hu_yar) November 29, 2023
दरम्यान, अनेकजण गिलने या व्हिडिओत अप्रत्यक्षपणे हार्दिक पंड्यावर निशाणा साधला, असे म्हणत आहेत. गिलने संघातील महान खेळाडूंची नावे घेतली, त्यात हार्दिक पंड्या याचे नाव काहींना अपेक्षित होते. पण गिलने हार्दिकचे नाव घेतले नाही.
हार्दिक पंड्या इंडियन प्रीमियर लीग 2015 मध्ये सर्वप्रथम मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. 10 लाखाच्या बेस प्राईजवर त्याला संघात घेतले गेले होते. हार्दिकने मुंबई इंडियन्समध्ये स्वतःला सिद्ध केल्यानंतर पुढे त्याला भारतीय संघात संधी दिली गेली. येत्या काळात तो भारताच्या टी-20 संघाचा नियमित कर्णधार बनू शकतो. (As soon as he became the captain of Gujarat Titans, Shubman Gir targeted Hardik Pandya)
महत्वाच्या बातम्या –
ना गिल, ना श्रेयस, ना राहुल; अंबाती रायुडूने ‘या’ स्टार खेळाडूला म्हटले भारताचा Future Captain
Video : गुजरातचा कर्णधार बनताच शुबमनने साधला पंड्यावर निशाणा? म्हणाला, ‘लॉयल्टी…’