भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सध्या विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर सुरू आहे. शुक्रवारी (2 फेब्रुवारी) हा सामना सुरू झाला असून इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन महत्वाचे बदल पाहायला मिळाले. दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला आहे. वयाच्या 42व्या वर्षी अँडरसन एकाद्या युवा गोलंदाजाला लाजवेल असे प्रदर्शन करत आहे. शुक्रवारी मैदानात पाय टाकताच त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि फिरकीपटू जॅक लीच यांना संघातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी दिग्गज जेम्स अँडरसन आणि फिरकीपटू शोएब बशीर यांना संघात घेतले गेले. शोएबसाठी हा कसोटी पदार्पणाचा सामना आहे आणि त्याला अँडरसनसोबत खेळण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे अँडरसन तेव्हापासून कसोटी क्रिकेट खेळत आहे, जेव्हा शोएबचा जन्म देखील झाला नव्हता. त्याने 2003 साली कसोटी पदार्पण केले होते.
शुक्रवारी वायझॅक स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. अँडरसन मैदानात आल्याबरोबर तो भारतात कसोटी सामना खेळणारा पाचवा सर्वात वयस्कर गोलंदाज ठरला. सध्या अँडरसनचे वय 41 वर्ष आणि 187 दिवस आहे. भारतात कसोटी सामना खेळणारे सर्वात जॉन ट्रेकोस आहेत. त्यांनी 1993 साली 45 वर्ष आणि 300 दिवसांच्या वयात भारतात कसोटी सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या दोन देशांकडून त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.
यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा अमिर इलाही (44 वर्ष 102 दिवस), तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा हॅरी इलियट (42 वर्ष 100 दिवस) आहे. भारतीय संघाचे माजी दिग्गज वीनू मांकड यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. मांकड यांनी 41 वर्ष आणि 300 दिवसांच्या वयात मायदेशात कसोटी सामना खेळला होता. (As soon as he stepped into the field for the Visakhapatnam Test, a special record was registered in James Anderson’s name)
भारतात कसोटी सामना खेळणारे सर्वात वयस्कर खेळाडू
45 वर्ष 300 दिवस – जॉन ट्रेकोस (1993)
44 वर्ष 102 दिवस – अमिर इलाही (1952)
42 वर्ष 100 दिवस – हॅरी इलियट (1934)
41 वर्ष 300 दिवस – विनू मांकड (1959)
41 वर्ष 187 दिवस – जेम्स अँडरसन (2024)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
प्रतिक्षा संपली! देशांतर्गत क्रिकेटच्या हिरोला भारताकडून पदार्पणाची संधी, महत्वाचा गोलंदाज संघातून बाहेर
ओडिशा एफसी अव्वल स्थान डोळ्यासमोर ठेऊन केरला ब्लास्टर्स एफसीचा सामना करणार