भारतीय महिला क्रिकेटसाठी यंदाचे वर्ष खास ठरले आहे. यावर्षी बर्मिंघम येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारत उपविजेता ठरला. तेव्हा प्रथमच महिला क्रिकेटचा त्या स्पर्धेत समावेश केला गेला. त्यानंतर भारताने इंग्लंड दौऱ्यात वनडे मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. आता भारत आशिया चषक (Asia Cup) 2022च्या विजेता ठरला. अंतिम सामन्यात त्यांनी श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव करत सातव्यांदा आशिया चषकाचा किताब पटकावला. याचे सेलेब्रेशनही तसेच जोरात झाले असून सोशल मीडियावर तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
भारताकडून या सामन्यात सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हीने 25 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. तिने 8.3व्या षटकात उत्तुंग षटकार खेचत संघाचा विजय पक्का केला. तेव्हा सीमारेषेवर थांबलेल्या तिच्या संघसहकाऱ्यांनी सामना जिंकताच जल्लोष करत तिच्या दिशेने धाव घेतली. या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू चाहत्यांचे आभार मानताना देखील दिसत आहेत. तसेच त्यांनी मैदानाचे रिंगण घालत सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना धन्यवाद म्हणत सेल्फीही काढल्या आहेत.
तत्पूर्वी, पहिला आशिया चषक जिंकण्यासाठी आसुसलेल्या श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय गोलंदाजांंनी त्यांचा जबरदस्त फॉर्म कायम राखत श्रीलंकेला एकामागोमाग धक्के दिले. अवघे 10 षटक झाले असता श्रीलंकेने 7 विकेट्स गमावत 27 धावा केल्या होत्या. रेणुका सिंग, दीप्ति शर्मा, राजेश्वरी गायकवाड, स्नेह राणा यांच्या भेदक गोलंदाजीने भारताला 66 धावांचे लक्ष्य मिळाले.
Team India 🇮🇳 is your 2022 #WomensAsiaCup Champions 🏆#ACC #AsiaCup2022 @BCCIWomen pic.twitter.com/q330gZYNAG
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 15, 2022
बांगलादेशच्या सिल्हेट मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करताना शफाली वर्मा आणि जेमीमा रोड्रिग्ज यांच्या विकेट लवकर पडल्या. त्यानंतर मंधानाने कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्यासोबत भारताला आशियाचे चॅम्पियन केले. मंधानाने तिच्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार मारले. हरमनप्रीत 11 धावा करत नाबाद राहिली.
भारत-श्रीलंका हे दोन संघ आशिया चषकाच्या इतिहासात आतापर्यंत पाच वेळा अंतिम सामन्यात समोरा-समोर आले आणि या पाचही सामन्यात भारतच विजेता ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दीप्तिचे नाव घेत स्टार्कने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड! भारताच्या माजी क्रिकेटपटूने सुनावली खरी खोटी
शॉकिंग! शमीच्या एक्स पत्नीसोबत चालत्या रेल्वेमध्ये घडली मोठी घटना, तिकीट तपासणाऱ्या कर्मचाऱ्याने…