fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

घर फिरले की घराचे वासेही फिरतात, डेल स्टेनवर आली सर्वात मोठी वाईट वेळ

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सोमवारी वार्षिक मानधन करार यादीची घोषणा केली आहे. यामध्ये ब्यूरॉन हेंड्रिक्सला संधी मिळाली आहे. यावेळी वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्तज, अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन प्रिटोरियस आणि फलंदाज रॅसी वॅन दर दुसेन या खेळाडूंचाही या यादीत समावेश केला आहे.

परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वार्षिक मानधन कराराच्या (National contracts) यादीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या (Dale Steyn) नावाचा समावेश नाही.

क्रिकेट दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने (Cricket South Africa) आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, “यावेळी देखील अपग्रेड सिस्टम त्याच्या जागी असेल. यावर्षी उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू राष्ट्रीय करारामध्ये घेतले जातील. यामध्ये करार नसलेल्या खेळाडूंचादेखील समावेश असेल.”

यावर्षी दक्षिण आफ्रिका टी२०चे बरेच सामने खेळताना दिसणार आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध आपल्या देशात टी२० मालिका खेळेल. यानंतर संघाला परदेशात श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडीजविरुद्ध टी२० मालिका खेळायची आहे.

यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर ३ सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी आला होती. यातील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित २ सामनेही कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) वाढत्या धोक्यामुळे रद्द करण्यात आले. सध्या या खेळाडूंना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-तर आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातील या ४ स्टेडियमवर होणार

-बीसीसीआयचं अध्यक्षपद कायम रहावं म्हणून गांगुलीसाठी या व्यक्तीने लावली फिल्डींग

-त्या १४ धावा अशा होत्या की सचिनने लगेच उंचावली होती बॅट

You might also like