---Advertisement---

यशस्वीने इंग्लंडविरुद्ध इतिहास रचताच ॲलिस्टर कूकचे वक्तव्य म्हणाला, “यशस्वी जैस्वालने एका दिवसात माझ्या…

On: सोमवार, फेब्रुवारी 19, 2024 9:43 AM
Alastair Cook
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने सलग दुसरे शतक झळकावले. यशस्वी जैस्वालने २३२ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. तसेच त्याने इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत दुसऱ्यांदा द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याचबरोबर या द्विशतकाच्या जोरावर त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

याबरोबरच, कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 10 षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. याबाबत इंग्लंडचा माझी कर्णधार ॲलिस्टर कूक म्हणाला आहे की, “यशस्वी जैस्वालने एका दिवसात माझ्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत माझ्यापेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत”.

तसेच  टीम इंडियाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात 434 धावांची विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 557 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने इंग्लंडला या विजयी धावांचा पाठलाग करताना 39.4 ओव्हरमध्ये 122 धावांवर गुंडळला गेला आहे. याबरोबरच टीम इंडियाने इंग्लंडला चौथ्याच दिवशी पराभूत केलं. टीम इंडियाने या विजयासह इतिहास रचला आहे.

टीम इंडियाचा हा कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला. तसेच टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. यशस्वी जैस्वाल  कॅप्टन रोहित शर्मा, डेब्युटंट सरफराज खान आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा हे चौघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.

दरम्यान, टीम इंडियाच्या विजयात सर्वांचंच योगदान राहिलं. मात्र कॅप्टन रोहितसह सरफराज खान, यशस्वी आणि रवींद्र जडेजा या चौघांनी निर्णायक भूमिका बजावली. पहिल्या डावा टीम इंडियाची घसरगुंडी झालेली असताना जडेजा आणि रोहितने द्विशतकी भागदारी केली. तसेच या दोघांनी वैयक्तिक शतकी खेळी केली. रोहितने 131 आणि जडेजाने 112 धावा केल्या. तर सरफराजने पदार्पणातील दोन्ही डावात 62 आणि नाबाद 68 धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---