अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असघर स्टॅनिकझई सध्या आपल्या नावात केलेल्या बदलामुळे चर्चेत आहे.
असघर स्टॅनिकझईने आपल्या नावात बदल करत, आपले नाव असघर अफगाण असे केले आहे.
याचा खुलासा अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन केला आहे.
“अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असघर स्टॅनिकझईने देशाच्या आणि देशातील नागरीकांच्या सन्मानासाठी आपल्या नावात असघर अफगाण असा बदल केला आहे.” अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे.
Afghanistan National Cricket Team captain Asghar Stanikzai has changed his name to Asghar Afghan in honour of protecting the national identity of Afghan citizens.
The decision was made official when he registered for the new Electronic National Identity Cards (E-tazkira). pic.twitter.com/ZJLDJ9evSx— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 2, 2018
गेल्या एक ते दोन वर्षापासून अफगाणिस्तान क्रिकेट संघाने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे.
त्यामुळे अफगाणिस्तान आयसीसीने नुकताच कसोटी क्रिकेट संघाचा दर्जा दिला होता.
जून महिन्यात अफगाणिस्तान त्यांचा पहिला कसोटी सामना बेंगलोर येथे भारता विरुद्ध खेळला होता.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या चमकदार कामगिरीमुळे गेल्या काही काळात अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे.
तसेच भारतासहीत जगभरातील टी-२० लीगमध्ये रशिद खान आणि मुजीब उर रहीम सारखे फिरकीपटू चमकदार कामगिरी करत आहेत.
त्यामुळे येत्या काळात अफगाणिस्तान जागतिक क्रिकेटवर नक्कीच आपली छाप सोडणार आहे.
असघर अफगाणची (स्टॅनिकझई) क्रिकेट कारकिर्द-
कसोटी – १ सामना ३६ धावा
वन-डे – ८६ सामन्यात १६०८ धावा
टी-२० – ५४ सामन्यात ९६३ धावा
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-पहिली कसोटी: विराट कोहलीचा शतकी तडका; तर इंग्लंडची दुसऱ्या डावाला खराब सुरुवात
-पहिली कसोटी: विराट कोहलीने टीम इंडियाला तारले