इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात होणाऱ्या 71 व्या ऍशेस मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेत इंग्लंडचे खेळाडू त्यांची नावे आणि क्रमांक असलेली पांढरी कसोटी जर्सी घालून खेळणार आहेत.
त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होणार आहे की खेळाडू नावे आणि क्रमांक पाठीवर असणारी जर्सी घालणार आहेत. याआधी फक्त वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये नावे आणि क्रमांक पाठीवर असलेली जर्सी घालून खेळाडू खेळत होते.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटने त्याचा 66 हा क्रमांक आणि त्याचे नाव असलेली कसोटी जर्सी घातलेला फोटो इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले आहे की ‘कसोटीसाठी शर्टच्या(जर्सीच्या) पाठीवर नावे आणि क्रमांक आहेत.’
Names and numbers on the back of Test shirts! 🏴🏏 pic.twitter.com/M660T2EI4Z
— England Cricket (@englandcricket) July 22, 2019
तसेच आयसीसीने मोईन अली आणि स्टुअर्ट ब्रॉडचा त्यांचा क्रमांक आणि नाव असलेली कसोटी जर्सी घातलेला फोटो शेअर केला आहे. असे असले तरी अजून ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही या ऍशेज मालिकेत क्रमांक आणि नाव पाठीवर असलेली जर्सी घालणार की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
Red ball ☑️
Whites ☑️
Shirt numbers … ☑️👍 or 👎 ? pic.twitter.com/Jw5ykBZxuv
— ICC (@ICC) July 23, 2019
ही मालिकेबरोबरच आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपलाही सुरुवात होईल. 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅमला 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
या मालिकेआधी इंग्लंडचा संघ आयर्लंड विरुद्ध 24 ते 27 जूलैदरम्यान लॉर्ड्स मैदानावर एकमेव चारदिवसीय कसोटी सामना खेळणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टी२०सामन्यांसाठी असा आहे विंडीजचा संघ; या दोन खेळाडूंचे झाले पुनरागमन
–या सामन्यानंतर लसिथ मलिंगा घेणार वनडेतून निवृत्ती
–मुलाखत: फायनल खेळून ट्रॉफी जिंकावी हाच निर्धार – कर्णधार जोगिंदर नरवाल