सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात ऍशेस मालिका (Ashes Series) खेळली जात आहे. ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. त्यानंतर १६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील ऑस्ट्रेलिया संघ भक्कम स्थितीत आहे. या सामन्यात स्टीव स्मिथ (Steve Smith) वर ऑस्ट्रेलिया संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली गेली आहे. दरम्यान स्मिथ रात्री एक वाजता पुढच्या दिवशीच्या खेळाचा सराव करताना आढळला आहे.
क्रिकेट चाहत्यांनी यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला वेस्ट इंडीज दौऱ्यात मध्यरात्री शॅडो प्रॅक्टिस करताना पाहिले होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान स्टीव स्मिथला देखील रात्रीच्या जवळपास एक वाजता सराव करताना पाहिले गेले आहे.
स्मिथला शनिवारी (१८ डिसेंबर) रात्री शॅडो प्रॅक्टिस करताना पाहिले गेले. स्मिथची पत्नी डॅनी विलिसने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत स्मिथ त्याच्या नवीन बॅटचे निरिक्षण करत आहे.
स्मिथ प्रसिद्ध अमेरिकी सिटकॉम मालिका सीनफेल्डचा मोठा चाहता आहे. या व्हिडिओत देखील ही मालिका दिसत आहे. स्मिथ जेव्हा रात्री एकच्या दरम्यान शॅडो प्रॅक्टिस करत होता, तेव्हाही टीव्हीवर हाच कार्यक्रम चालू होता. अशीही माहिती आहे की, स्मिथ हा कार्यक्रम रोज रात्री पाहतो.
Steve Smith’s wife catches him shadow batting at 1am in their hotel room.
📸 Instagram/dani_willis #Ashes pic.twitter.com/5COJlUWiJt
— Nic Savage (@nic_savage1) December 18, 2021
विलिसने ऍशेस मालिकेतील हा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी यावर्षी जानेवारी महिन्यात देखील एक खास व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत होता. विलिसने भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या मालिकेदरम्यान देखील स्मिथ मध्यरात्री सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.
दरम्यान ऍशेस मालिका सुरू होण्यापूर्वी पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा नवीन कसोटी कर्णधार बनवले गेले होते. पण कोरोना संक्रमणामुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात सहभाग घेता आला नाही. कमिन्सच्या अनुपस्थितीत स्मिथकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आली आहे आणि त्याने ती चांगल्या प्रकारे पार पाडल्याचे दिसते. तत्पूर्वी स्मिथवर २०१८ मध्ये चेंडूशी छेडछाड प्रकरणी १२ महिन्यांची बंदी घातली गेली होती.
महत्वाच्या बातम्या –
‘ऍशेस’वर कोरोनाचे सावट, स्टार क्रिकेटरची मुलाखत घेणारा पत्रकार आढळला पॉझिटिव्ह
अरेरे! जोरदार शिंकेमुळे कोलमडली वॉर्नरची खुर्ची, पाहून घाबरले आजूबाजूचे सहकारी; व्हिडिओ व्हायरल
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतोय, “आता भारतीय बोलतील आमच्याकडे बाबर आणि रिझवान नाहीत”