---Advertisement---

स्मिथला उपकर्णधार बनविल्याने दिग्गजाने व्यक्त केली नाराजी; दिले ‘हे’ कारण

On: रविवार, नोव्हेंबर 28, 2021 1:26 AM
-STEVE-SMITH-TEST
---Advertisement---

आगामी ऍशेस मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न स्मिथला उपकर्णधाराच्या भूमिकेत परतताना पाहून फारसा आनंदात दिसत नाही. वॉर्नला चिंता आहे की स्मिथचे उपकर्णधार म्हणून पुनरागमन शक्य आहे. मात्र, दुसरीकडे डेविड वॉर्नरला त्याच्या देशाच्या कर्णधारपदावरून किंवा उपकर्णधारपदावरून कायम स्वरूपी निलंबित राहावे लागणार आहे.

शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्नस लॅब्युशेनला उपकर्णधार बनवण्याची मागणी केली आहे. स्टीव्ह स्मिथवर २०१८ मध्ये चेंडू छेडछाड केल्याप्रकरणी एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्याला ब्रिस्बेनमधील गाबा येथे ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऍशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

वॉर्नने शनिवारी (२७ नोव्हेंबर) आपल्या लेखात लिहिले की, “आम्हा सर्वांचे स्टीव्ह स्मिथवर प्रेम आहे. तो जगातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज आहे याचा आम्हाला अभिमान आहे, परंतु, तो ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार होता कामा नये. प्रत्येकाकडून चुका होतात. पण स्टीव्ह स्मिथला मिळालेली शिक्षा खूप गंभीर होती.”

सन २०१८ मध्ये, केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान एक वाद निर्माण झाला होता. ज्यामध्ये तत्कालीन ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि सहकारी कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर वेगवेगळ्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली होती.

एका वर्षाच्या निलंबनाव्यतिरिक्त, स्मिथवर दोन वर्षांसाठी कर्णधारपदावरही बंदी घालण्यात आली होती. तर, तत्कालीन उपकर्णधार असलेल्या वॉर्नरवरही एक वर्षाच्या बंदीसह कर्णधारपद आणि उपकर्णधारपद यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मुलाखतीनंतर कमिन्सची संघाचा कर्णधार आणि स्टीव्ह स्मिथची उपकर्णधार म्हणून निवड केली. या दोघांची ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पाच सदस्यीय पॅनेलने मुलाखत घेतली होती. शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले की, कमिन्स संघाचा कर्णधार असेल तर स्मिथ उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. स्मिथ याआधी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार राहिला आहे. मात्र, बॉल टेम्परिंगच्या वादानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. कमिन्सने यापूर्वी केवळ स्थानिक वनडे क्रिकेटमध्ये न्यू साउथ वेल्सचे नेतृत्व केले होते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---