ऍडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात ऍशेस २०२१-२२ मालिकेतील (Ashes 2021-22) दुसरा सामना ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर होत आहे. दिवस-रात्र स्वरुपातील या या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (१७ डिसेंबर) एक विचित्र घटना घडली. दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्राचा खेळ वीजेच्या कडकडाटामुळे थांबवण्यात आला.
झाले असे की, ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ९ बाद ४७३ धावांवर घोषित केला. त्यानंतर इंग्लंड संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला. पण नववे षटक सुरू असतानाच जोरदार आवाज झाला आणि वीज स्टेडियमच्या आसपास पडली असल्याची जाणीव झाली. सुदैवाने स्टेडियममध्ये कोणतेही संकट आले नाही. मात्र, वीज पडण्याच्या आवाजाने वातावरण भयभीत झाले. पंचांनीही लगेचच खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. (threat of a lightning strike at Adelaide Oval)
त्यामुळे पदार्पणवीर मायकल नेसर गोलंदाजी करत असलेल्या ९ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूनंतर सर्व खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नेसर पाचवा चेंडू टाकण्यामुळे वीज कोसण्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
वीजेच्या कडकडाटानंतर काहीकाळाने पावसालाही सुरुवात झाली. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपवण्याचा पंचांनी निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी लवकर खेळ संपल्याने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला १९ मिनिटे लवकर सुरुवात होईल.
Play has been suspended due to bad weather ⚡️
The umpires will assess shortly #Ashes pic.twitter.com/iYk3AdNIEH
— cricket.com.au (@cricketcomau) December 17, 2021
The only thing that could save England tonight was thunderbolts and lightning, very very frightening #Ashes https://t.co/1ckoPz3QmJ
— Lui Zacher (@lui_zacher) December 17, 2021
इंग्लंडने स्वस्तात गमावले २ विकेट्स
दुसऱ्या दिवशी खेळ संपला, तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात ८.४ षटकांमध्ये २ बाद १७ धावा केल्या होत्या. त्यांचे हसीब हमीद (६) आणि रॉरी बर्न्स (४) हे सलामीवीर झटपट बाद झाले. बर्न्सला मिशेल स्टार्क आणि हमीदला नेसरने बाद केले. त्यामुळे इंग्लंड संघ अद्याप ४५६ धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार जो रुट ५ धावांवर नाबाद आहे, तर डेविड मलान १ धावेवर नाबाद आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात धावांचा डोंगर
ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात सुरुवात अडखळत झाली, मात्र नंतर डेविड वॉर्नर आणि मार्नस लॅब्यूशेनने डाव सावरलाच नाही, तर ऑस्ट्रेलियाला भक्कम पाया रचून दिला. वॉर्नरचं शतक थोडक्यात हुकलं. तो ९५ धावा करून माघारी परतला. पण लॅब्यूशेनने त्याचे शतक पूर्ण करताना १०३ धावा केल्या.
त्यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथनेही जबाबदारीने खेळत ९३ धावांची खेळी केली. त्याचेही शतक थोडक्यात हुकले. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरेने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच मायकल नेसर आणि मिशेल स्टार्क यांनी देखील तळात चांगली फलंदाजी केली. नेसरने ३५ आणि स्टार्कने नाबाद ३९ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिला डाव १५०.४ षटकांनंतर ९ बाद ४७३ धावांवर घोषित केला.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ‘किंग कोहली’ची बॅट तळपणार? पाहा यापूर्वीची आकडेवारी
गांगुली म्हणतोय, ‘पदार्पणात चांगली कामगिरी असली, तरी श्रेयस अय्यरची खरी परिक्षा…’
जोस बटलरचे दिग्गज यष्टीरक्षकाने टोचले कान, ऍडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सोडले २ महत्त्वाचे झेल