ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटी स्टेडियमवर ऍशेस 2023 चा दुसरा सामना खेळला जात आहे. बुधवारी (28 जून) सुरू झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या. त्यांची दोन फलंदाजांनी अर्धशतक, तर एकाने शतक ठोकले. स्टीव स्मिथने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला.
नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आला. पहिल्या डावात त्यांनी एकूण 100.4 षटके खेळली आणि 416 धावा करून संघ सर्वबाद झाला. स्टीव स्मिथ (Steve Smith) 184 चेंडूत 110 धावांची सर्वोत्तम खेळी केली. सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांनी अनुक्रमे 66 आणि 77 धावांची खेळी केली आहे. इंग्लंडसाठी ओली रॉबिन्सन आणि नवखा जोश टंग (Josh Tongue) यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. जो रुटला 2, तर जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपण्याआधीच ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला गेला.
पहिल्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 बाद 339 धावा होती. इंग्लंडला दुसऱ्या दिवसाची पहिली विकेट मिळाली ऍलेक्स केरी (Alex Carey) याची. यष्टीरक्षक केरी अवघ्या 22 धावांवर बाद झाला. 85व्या षटकात संघाची धावसंख्या 351 धावा असताना सहावी विकेट गेली. त्यानंतर पुढच्या 15 षटकांमध्ये इंग्लंडला पुढच्या चारही विकेट मिळाल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स नाबाद 22 धावांसह खेळपट्टीवर कायम राहिला. दुसऱ्या दिवशी पहिले सत्र संपेपर्यंत इंग्लंडने नबाद 13 धावा केल्या.
तत्पूर्वी ऍशेस मालिकेच्या पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडला 2 विकेट्सने पराभव स्वाकारावा लागला होता. एजबस्टन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या दिवसी संयमी खेळत दाखवत विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलिया सध्या 0-1 अशा आघाडीवर आहे. (Ashes 2023 Australia’s first innings ended on 416 runs in the Lord’s Test)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
FIFA Rankings : टीम इंडियाने उंचावली 140 कोटी भारतीयांची मान, पाच वर्षात पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा
MPL : अर्रर्र! क्लीन बोल्डचा निर्णयही थर्ड अंपायरलाच द्यावा लागला, पण का ओढवली अशी वेळ?