बलाढ्य इंग्लंड क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये वेगाने नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023चा पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी रूटने वादळी फलंदाजी करत शतक झळकावले. एका बाजूने विकेट्स पडत असतानाही त्याने टिच्चून फलंदाजी करत कसोटी कारकीर्दीतील 30वे शतक झळकावले. यासोबतच त्याने सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रमही मोडीत काढला. रूटने 131व्या सामन्यात हा कीर्तिमान प्रस्थापित केला. रूटने 145 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने शतक ठोकले. पुढे आणखी दोन षटकारांच्या मदतीने 152 चेंडूत 118 धावा पूर्ण करत रूट नाबाद राहिला.
कसोटीत सर्वाधिक शतके करणारा जगातील 10वा फलंदाज
जो रूट (Joe Root) कसोटी कारकीर्दीत सर्वाधिक शतके ठोकणारा 10वा फलंदाज बनला. त्याने याबाबतीत ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांनाही मागे सोडले. ब्रॅडमन यांच्या नावावर 52 कसोटी सामन्यातील 80 डावात 29 शतकांची नोंद आहे. अशात रूटने 30वे कसोटी शतक झळकावताच ब्रॅडमन यांचा विक्रम मोडीत काढला. रुटने आता याबाबतीत वेस्ट इंडिजचा दिग्गज शिवनारायण चंद्रपॉल आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मॅथ्यू हेडन यांची बरोबरी साधली आहे. यांनी कसोटीत 30 शतके झळकावली आहेत. कसोटीत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर आहे. त्याने 51 शतके कली होती.
इंग्लंडचा दुसरा फलंदाज
रूट हा इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. त्याने 30 शतकांचा आकडा गाठताच तो अव्वल स्थानी असलेल्या ऍलिस्टर कूक याच्या जवळ पोहोचला. कूकने त्याच्या कारकीर्दीत 33 शतके झळकावली होती. रूटच्या नावावर कसोटीत 11 हजारांहून अधिक धावांची नोंद झाली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा 11वा खेळाडू
जो रूट हा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 11व्या स्थानी पोहोचला आहे. त्याने कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये मिळून 46 शतके केली. त्याच्या निशाण्यावर आता 10व्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिविलियर्स आणि 9व्या स्थानी असलेला दिग्गज राहुल द्रविड याच्या स्थानी आहे. डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 47, तर द्रविडने 48 शतके झळकावली होती. (ashes 2023 cricketer joe root hits 30th test century breaks don bradman record)
महत्वाच्या बातम्या-
‘किंग कोहली’ टॉपर असलेल्या ‘त्या’ विक्रमाच्या यादीत रूटने गाठला दुसरा क्रमांक, कांगारुविरुद्धच्या शतकाची कमाल
अफलातून! बाऊंड्री लाईनवर झेप घेत पठ्ठ्याने एका हाताने पकडला झेल, असा Catch तुम्ही कधीच पाहिला नसेल