ऍशेस 2023 खेळण्यासाठी इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याने आपली निवृत्ती मगे घेतली. शुक्रवारी (16 जून) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ही ऐतिहासिक स्पर्धा सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला जात आहे. शनिवारी (17 जून) मोईन अलीला संघात घेतल्याचा इंग्लंड संघाला फायदा झाला. मोठ्या काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये या अष्टपैलूला विकेट मिळाली.
ऍशेस 2023ची मागच्या काही महिन्यांपासून चर्चा रंगली होती. अखेर चाहत्यांना शुक्रवारी हा थरार अनुभवता आला. अगदी पहिल्या सामन्यापासून चाहत्यांचा चांगला प्रतिसाद या कसोटी मालिकेला मिळत आहे. इंग्लंड संघ आपल्या घरच्या मैदानावर चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. मोईन अली (Moeen Ali) याला तब्बल दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पहिली विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियन संघाचा मध्यक्रमातील फलंदाज ट्रेविस हेड खेळपट्टीवर होता आणि 50 धावा करून तो मोईन अलीची शिकार बनला. 46व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हेड झॅक क्राउलीच्या हातात झेलबाद झाला.
The dangerous Travis Head departs for 5️⃣0️⃣
And Moeen Ali has his first wicket back in whites ???? #EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/ZlkqUtrSnW
— England Cricket (@englandcricket) June 17, 2023
मोईन अली आपला शेवटचा कसोटी सामना 2 सप्टेंबर 2021मध्ये भारताविरुद्ध खेळला होता. त्यावेळी भारताच्या दोन विकेट्स त्याने घेतल्या होत्या. त्यानंतर मागच्या दोन वर्षांमध्ये तो कसोटी क्रिकेटपासून लांब होता. 16 जून 2023 रोजी त्याने पुन्हा एकदा इंग्लंड संघाची जर्सी घातली आणि 17 जूनला विकेट मिळवली. सामन्याचा एखंदरीत विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने हेडची विकेट गमावली तेव्हा संघाची धावसंख्या 4 बाद 148 धावा होती.
मोईन अलीच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या 112 कसोटी सामन्यांमध्ये 195 विकेट्स घेतल्या आहेत. 112 धावा खर्च करून 10 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने पाच वेळा पाच विकेट्सचा कारनामा केला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये 129 सामन्यात 99 विकेट्स घेतल्या आहेत. (Ashes 2023 ENG vs AUS Moeen Ali got a Test wicket after two years)
महत्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तानच्या स्पिनर्सला घाबरला पाकिस्तान! वर्ल्डकप सामन्याचे ठिकाण बदलण्याची केली मागणी
वॉर्नरची पाठ सोडण्याच्या विचारात नाही इंग्लिश गोलंदाज! कसोटीत 15 वेळा केली शिकार






