इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू मोईन अली याने आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. यावर्षी भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. वनडे विश्वचषकानंतर मोईन अली वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घोषित करू शकतो. इंग्लिश क्रिकेटपटूने यामागचे कारण देखील स्पष्ट केले आहे. मोईन अलीने यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून सध्या तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सक्रिय आहे.
भारतात यावर्षी खेळला जाणारा वनडे विश्वचषकला मोईन अली (Moeen Ali ) याची प्राथमिकता आहे, असे त्याने स्वतः स्पष्ट केले. याविषयी माध्यमांसमोर बोलताना मोईन म्हणाला, “मी खुपसारे लक्ष्य ठरवत नाही. पण मला आगामी विश्वचषकात केळायचे आहे. आशा अशीही आहे की, आम्ही हा विश्वचषक जिंकू आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल.” पुढे आपल्या निवृत्तीविषयी देखील मोईनने प्रतिक्रिया दिली.
मोईन म्हणाला, “मी असे म्हणत नाहीये की निवृत्त होईल किंवा होणार नाही. वयाच्या 35व्या वर्षी सात-आठ महिने खूप असतात. ही एक अशी वेळ आहे, जिथे लियाम लिविंगस्टोन आणि विल जॅक्स यांच्याकडे मी पाहत आहे. मला असे वाटते की, माझे काम झाले आहे. पुढच्या विश्वचषकासाठी खेळाडू तयार व्हावेत, असे मला वाटते.” दरम्यान लियाम लिविंगस्टो आणि विल जॅक्स या युवा खेळाडूंनी अलिकडच्या काळात जबरदस्त प्रदर्शन करकत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
“मी अजून कोणा एका निर्णयावर पोहोचलो नाहीये. पण मला अंदाजा आहे, मी काय केले पाहिजे. जेव्हा मी नवीन खेळाडू संघात येताना पाहतो, तेव्हा खरोखर मला आनंद होतो. संघासाठी हे सर्वोत्तम आहे,” असेही मोईन अले शेवटी म्हणाला. दरम्यान, मोईनच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने इंग्लंडसाठी 64 कसोटी, 129 वनडे आणि 73 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत 2914, वनडेत 2212, तर टी-20 फॉरमॅटमध्ये 1064 धावा केल्या. गोलंदाजीचा विचार केला, तर या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अनुक्रमे 195, 99 आणि 42 विकेट्स घेतल्या.
(Moeen Ali may retire from ODI cricket after the upcoming 2023 World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी । भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी स्टीव स्मिथ बनला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार!
WPL 2023: सलग पाचव्या सामन्यात आरसीबी पराभूत! रोमांचक सामन्यात दिल्लीचा 6 विकेट्सने विजय