---Advertisement---

इंग्लंडच्या फक्त तोंडातच दम! ऍशेस गमावण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या टीमवर संतापला माजी दिग्गज

On: बुधवार, जुलै 5, 2023 5:35 PM
Eng-vs-Aus
---Advertisement---

ऍशेस मालिका 2023मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या ऍशेस कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले आहेत. मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स येथे पार पडला या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 43 धावांनी विजय मिळवला. अशात इंग्लंडच्या पराभवानंतर माजी खेळाडूंनी संघावर ताशेरे ओढले. यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याच्या नावाचाही समावेश आहे.

काय म्हणाला पीटरसन?
माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने म्हटले आहे की, इंग्लंड संघ फक्त मोठमोठ्या गोष्टी बोलत आहे, पण त्यांची कामगिरी त्याप्रमाणे नाहीये. पीटरसननुसार, तुम्ही ज्या हिशोबाने बोलत आहात, त्या हिशोबाने तुमची कामगिरीही असली पाहिजे.

पीटरनसने इंग्लंडवर साधला निशाणा
पीटरसननुसार, विधानांप्रमाणे तुमचे कामही तसे मोठे असले पाहिजे. त्याने लिहिलेल्या एका स्तंभामध्ये म्हटले की, “जर विधानं करत असाल, तर प्रदर्शनही त्याचप्रकारचे असले पाहिजे. हा इंग्लंड संघ विधानांसारखे प्रदर्शन करत नाहीये. संघ असे दाखवून देत आहे की, ते सर्वोत्तम संघ आहेत, पण यावेळी ते 2001नंतर पहिल्यांदा इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका गमावणारा संघ बनण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. पहिल्या सामन्यानंतर ऑली रॉबिन्सन म्हणाला की, त्याला वाटले त्यांनी सामना जिंकला आहे. जिमी अँडरसन खेळपट्टीबाबत तक्रार करत होता. त्यानंतर झॅक क्राऊले म्हणाला की, संंघ पुढील सामना 150 धावांनी जिंकेल. आता पुढील सामन्यापूर्वी या सर्व गोष्टी बोलल्या नाही पाहिजेत. अशाप्रकारची विधानं करून ते स्वत:वरच दबाव टाकत आहेत.”

इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिका 2023मधील (Ashes Series 2023) पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाला आहे. संघाला सर्वात आधी एजबॅस्टन आणि त्यानंतर लॉर्ड्समध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ऍशेस मालिकेच्या सुरुवातीपूर्वी इंग्लंडच्या बॅझबॉल स्टाईलची चांगलीच चर्चा रंगली होती. इंग्लंडकडून त्यांच्या या आक्रमक दृष्टिकोनाविषयी बरीच विधानं येत होती. मात्र, संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तसेच, आता ऍशेस मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर आहेत. (ashes 2023 former skipper kevin pietersen slams england team performance)

महत्वाच्या बातम्या-
BREAKING । तिसऱ्या ऍशेस सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर, संघातून अँडरसनचा पत्ता कट
लॉर्ड्स कसोटी गाजवणारा स्मिथ कसोटी रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी विराजमान, पण अव्वलस्थान ‘या’ दिग्गजाकडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---