---Advertisement---

ASHES 2023 । जो रुटकडून ऍलन बॉर्डरच्या विक्रमाला धक्का! लॉर्ड्स कसोटीत केला नवा विक्रम

Joe Root
---Advertisement---

लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ 221 धावांनी आघाडीवर आहे. ऍशेस 2023चा हा दुसरा सामना बुधवारी (28 जून) सुरू झाला. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सने विजय मिळवला होता. पण इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज जो रुट यानेही एजबस्टन कसोटीत शतक केले होते. शुक्रवारी (30 जून) रुट स्वस्तात बाद झाला. मात्र, त्याच्या नावावर मोठा विक्रम देखील नोंदवला गेला.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये कांट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलायने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 325 धावांवर आटोपला. सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी जो रुट (Joe Root) 10 धावा करून तंबूत परतला. पण या 10 धावांच्या जोरावर रुटने ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ऍलन बॉर्डर (Allan Border) यांचा विक्रम मोडीत काढला. रुट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 10 खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. बॉर्डर यांच्या नावावर 156 कसोटी सामन्यांमध्ये 11174 धावांची नोंद आहे. तर रुटच्या 132 कसोटी सामन्यांमध्ये 11178 धावा झाल्या आहेत.

सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर आहे. सचिनने कसोटी कारकिर्दीत 15921 धावा केल्या आहेत. इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम ऍलिस्टर कूक (Alastair Cook) याच्या नावावर आहे. कूकने कसोटी कारकिर्दीत 12472 धावा केल्या आहेत. एकंदरीत विचार करता सर्वाधिक कसोटी धावांच्या बापतीत कूक पाचव्या क्रमांकावर आहे. रुट या यादीत 10व्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Ashes 2023 Joe Root broke Allan Border’s record in Lord’s Test)

कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणारे 10 फलंदाज
सचिन तेंडुलकर – 15921
रिकी पाँटिंग – 13378
जॅक कॅलिस – 13289
राहुल द्रविड – 13288
एलिस्टर कूक – 12472
कुमार संगकारा – 12400
ब्रायन लारा – 11953
शिवनारायन चंद्रपॉल – 11867
महेला जयवर्धने – 11814
जो रुट – 11178

महत्वाच्या बातम्या –
लायनच्या जागी ‘हा’ गोलंदाज खेळणार ऍशेस 2023! एका मालिकेत विराटला चार वेळा धाडलंय तंबूत
आशिया चषकापूर्वी आफ्रिदीने इंग्लंडमध्ये दाखवला इंगा, पहिल्याच ओव्हरमध्ये घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स, Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---