---Advertisement---

कोट्यावधी भारतीयांची मने जिंकणारा विराट बेन स्टोक्समुळे प्रभावित, वाचा काय म्हणाला किंक कोहली

Ben Stokes
---Advertisement---

ऑस्ट्रेलिय संघाने ऍशेस 2023मधील सलग दुसरा सामनाही जिंकला. उभय संघांतील लॉर्ड्स कसोटी सामना रविवारी (2 जुलै) ऑस्ट्रेलियाने जिंकला. इंग्लंडला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, पण त्यांचा कर्णधार बेन स्टोक्स कौतुकास पात्र ठरला. स्टोक्सने शेवटच्या डावात 155 धावांची वादळी खेळी केली. भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्यावरही स्टोक्सच्या या खेळीचा प्रभाव पडल्याचे दिसले.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील हा दुसरा कसोटी सामना चांगलाच रोमांचक झाला. विजयासाठी इंग्लंडला 371 धावांचे लक्ष्य मिळाले होते, तर शेवटच्या दिवशी त्यांना 257 धावा हव्या होत्या. बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि बेन डकेत यांनी शेवटच्या दिवशी डावाची सुरुवात केली. त्यावेळी स्टोक्स 29* आणि तर डकेत 50* धावांसह खेळपट्टीवर होते. डकेतच्या रुपात शेवटच्या दिवसातील पहिली विकेट गेली. त्याने वैयक्तिक 83 धावा केल्या आहेत. तर बेन स्टोक्सने 155 धावा केल्या. स्टोक्स इंग्लंडला विजय मिळवून देईल, असे चाहत्यांना वाटत होते. मात्र, डावातील 73व्या षटकात त्याने जोश हेजलवूडने त्याला यष्टीरक्षक ऍलेक्स केरीच्या हातून बाद केले.

स्टोक्सने डावातील 56व्या षटकात कॅमरून ग्रीनला लागोपाट तीन षटकारही मारले. या वादळी खेळीसाठी स्टोक्सचे सर्वत्र कौतुक होत आहे. विराट कोहली (Virat Kohli) यानेही आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून त्याचे कौतुक केले. विराटने लिहिले की, “मी विनोद करत नव्हतो…बेन स्टोक्स सर्वात मोठा प्रतिस्पर्धी खेळाडू आहे, ज्याच्याविरोधात मी खेळलो. त्याने अप्रतिम खेळी केली, पण सध्या सध्या ऑस्ट्रेलियन संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे.”

शेवटच्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे प्रदर्शनही वादळी होते. कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. कॅमरून ग्रीनला एक विकेट मिळाली. सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 416, तर इंग्लंडने 325 धावा केल्या. पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 279 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. विजयासाठी 371 धावांचे लक्ष्य असताना इंग्लंड संघ मात्र अखेरच्या डावात 327 धावांपर्यंतच मजल मारू शकला. (Virat Kohli praises Ben Stokes)

महत्वाच्या बातम्या –
तुषार देशपांडेला मिळाली आणखी एक संधी! आता ‘या’ संघासाठी दाखवणार दम
ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत लॉर्ड्सवर धक्काबुक्की? संघ व्यवस्थापनाने एमसीसीकडे केली तपासाची मागणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---