---Advertisement---

ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत लॉर्ड्सवर धक्काबुक्की? संघ व्यवस्थापनाने एमसीसीकडे केली तपासाची मागणी

On: रविवार, जुलै 2, 2023 9:11 PM
A tussle at Lord's with the Australian players
---Advertisement---

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटीचा शेवटचा दिवस फारच रोमांचक ठरला. इंग्लंडला शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी (2 जुलै) विजयासाठी 257 धावांची आवश्यकता होत. पण विजय मात्र ऑस्ट्रेलियानेच मिळवला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील संघ … धावांनी जिंकला. मात्र, त्यांच्या खेळाडूंना टीकेला सामोरे जावे लागले. लॉर्ड्सच्या मेंबर्स एरिआमध्ये खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत गैरव्यावहार देखील झाला. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने मोठे पाऊल उचलले आहे.

रविवारी (2 जुलै) पहिले सत्र संपल्यानंतर इंग्लंडची धावसंख्या 6 बाद 243 धावा होती. बेन स्टोक्स त्यावेळी 108* तर स्टुअर्ट ब्रॉड 1* धावांसह खेळपट्टीवर कायम होते. लंच ब्रेक झाल्यानंतर दोन्ही संघ पवेलियनच्या दिशेने जात होते. ऑस्ट्रेलियन खेळाडूंविषयी इंग्लंड संघाच्या मसर्थकांमध्ये प्रचंड संताप दिसत होता. कारण त्याआधीच त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो () याला नाटकीय पद्धतीने बाद दिले गेले होते. याच पार्श्वभूमीवर पवेलियनमध्ये परतताना लॉर्ड्सच्या मेंबर्स एरिआमध्ये (लॉन्ग रूम) ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि त्याठिकाणी उपस्थित एक सदस्य यांच्यात वाद झाला.

या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि डेविड वॉर्नर या सदस्याशी थेट भिडल्याचे पाहायला मिळाले. माहितीनुसार ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने याविषयी क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसीकडे तपासाची मागणी केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मते मेंबर्स एरिआमध्ये त्यांच्या खेळाडूंसोबत गैरवर्तन आणि आणि धक्काबुक्की झाली आहे. (Ashes 2023 A tussle at Lord’s with the Australian players)

महत्वाच्या बातम्या –
चहलला आयसीसी स्पर्धांमध्ये संधी मिळत नसल्याने पेटून उठला गांगुली, म्हणाला, ‘भारतीय संघाला…’
‘आग लगे बस्ती में, बाबा अपनी मस्ती में’, विंडीज हारताच गेलने शेअर केला व्हिडिओ, चाहत्याची कमेंट चर्चेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---