इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर खेळाला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन मात्र अपेक्षित प्रदर्शन करताना दिसत नाहीये. अँडरसन दुखापतीतून परतल्यानंतर लयीत दिसत नाहीये. त्याच्या प्रदर्शनावर प्रश्न उफस्थित आहेत. पण ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज रिकी पाँटिंग अँडरसनबाबत सकारात्मक विचार करत आहे.
ऍशेस 2023चा पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टोडियवर खेळला गेला, जो ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने जिंकला. पहिल्या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज जेम्स अँडरसन () अफेक्षित प्रदर्शन करू शकला नाही आणि संघाला त्याची किंमत मोजावी लागली. त्याने या सामन्यात पहिल्या डावात एक, तर दुसऱ्या डावा एकही विकेट घेतली नव्हती. लॉर्ड्सवर खेलल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीतही अँडरसनने पहिल्या डावातील 20 षटकांमध्ये 53 धावा खर्च करून एक विकेट घेतली आहे. चाहत्यांना यावेळी अँडरसनच्या गोलंदाजीत आधीप्रमाणे धार दिसत नाहीये.
अँडरसनचे ऍशेसमधील प्रदर्शन पाहून चाहते चिंता व्यक्त करत आङेत. जाणकार वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. पण रिकी पाँटिंग अँडरसनविषयी सकारात्मक आहे. पाँटिंगच्या मते एजबस्टन कसोटीत अँडरसनला लय मिळाली नाही, कारण त्याठिकाणची परिस्थिथीत त्याच्यासाठी प्रतिकूल होती. पाँटिंग म्हणाला, “मला वाटते तो बर्मिंघममध्ये म्हटला होता की, पहिल्या सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करू शकलो नाही. तो लयीत दिसत नाहीये. चेंडू त्या पद्धतीने हातातून निघत नाहीये, ज्या पद्धतीने त्याची अपेक्षा आहे.”
दरम्यान, आयसीसी कसोटी क्रमवारीत अँडरसन सध्या दुसर्या क्रमांकावऱ आहे. लॉर्ड्स कसोटीत जर तो संघासाठी अपेक्षित योगदान देऊ शकला नाही, तर त्याच्या कसोटी क्रमवारीत घसरन येऊ शकते. क्रमवारीत पहिल्या क्रमांकवर रविचंद्रन अश्विन आहे. (Ashes 2023 । Ricky Ponting believes in James Anderson’s comeback)
महत्वाच्या बातम्या –
रत्नागिरी जेट्सचे पाच पांडव! सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाला बनवले चॅम्पियन
पुण्याने गमावली एमपीएल ट्रॉफी, पण सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत पुणेकरांचीच आघाडी