ऍशेस 2023 कसोटी मालिकेचा दुसरा सामना बुधवारी (28 जून) लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केली आणि संघाला चांगली सुरुवात देखील मिळाली. ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ पहिल्या दिवशी महत्वपूर्ण योगदान देऊ शकला. सोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मैलाचा दगड देखील पार केला.
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 339 धावा केल्या. स्टीव स्मिथ (Steve Smith) 85 धावांसह खेळपट्टीवर कायम होता. त्याच्या साथीला यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स केरी (Alex Carey) देखील पहिल्या दिवसाच्या शेवटापर्यंत खेळपट्टीवर कायम होता. दुसऱ्या दिवशी याच दोघांनी ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात केली. स्मिथने यादरम्यान आपल्या 15000 आंतरारष्ट्रीय आणि 9000 कसोटी धावांचा टप्पा पार केला.
स्मिथने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात एक फिरकी गोलंदाज म्हणून केली होती. पण नंतर चांगल्या फलंदाजी प्रदर्शनामुळे त्याने फलंदाज बनण्याचा निर्णय घेतला. बुधवारी (28 जून) लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी नाबाद 85 धावा ठोकल्यानंतर स्मिथ एका खास यादीत सामील झाला आहे. तो 15000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा 41 वा खेळाडू ठरला आहे. या 41 खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे सर्वाधिक 9 खेळाडू आहेत. 8 फलंदाजांसह भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. श्रीलंका आणि वेस्ट इंडीज यांच्या प्रत्येकी 5-5 फलंदाजांनी 15000 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येक 4-4 फलंदाजांनी ही कामगिरी केली. तर न्यूझीलंडच्या 3 आणि इंग्लंडच्या 2 फलंदाजांची नावे या यादीत आहेत. बांगलादेश संघाच्याही एका फलंदाजाने 15000 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 15000 धावा करण्याचा विक्रम आजही विराट कोहली याच्याच नावावर आहे. विराटने अवघ्या 333 धावा केल्या होत्या. दुसरीकडे स्मिथने हा टप्पा गाठण्यासाठी एकूण 351 डाव खेळले आहेत. यादीतील हाशिम आमलाने 336, विव रिचर्ड्सने 344, मॅथ्यू हेडनने 347, केन विलियम्सनने 348, तर जो रुटने ही कामगिरी 350 डावांमध्ये केली होती. (Ashes 2023 । Steve Smith completes his 15000 international runs)
महत्वाच्या बातम्या –
MPL : अर्रर्र! क्लीन बोल्डचा निर्णयही थर्ड अंपायरलाच द्यावा लागला, पण का ओढवली अशी वेळ?
मूर्ती लहान पण कीर्ती महान!! अकरा वर्षीय हमजा याला आशियाई रेसिंग स्पर्धेत उपविजेतेपद