---Advertisement---

Ashes 2023 । स्मिथवर मान खाली घालण्याची वेळ! कारकिर्दीवर लागलेला डाग प्रेक्षकांनी पुन्हा दाखवून दिला

Steve Smith
---Advertisement---

ऍशेस 2023चा पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात दोन्ही संघ जबरस्त प्रदर्शन करताना दिसले. दरम्यान, ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत इंग्लिश क्रिकेट संघाला समर्थन देण्यासाठी मैदानात आलेले चाहते, स्मिथला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्टीव स्मिथ (Steve Smith) ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक आहे. पण त्याच्या कारकिर्दीवर 2018 साली एक डाव लागला, जो आजही विसरता येणार नाही. स्टीव स्मिथ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड करताना सापडला होता. याच पार्श्वभूमीवर त्याच्यावर मोठी कारवाई देखील झाली होती. आपल्या चुकीसाठी स्मिथने शिक्षा भोगली आणि संघात जोरदार पुनरागमन केले आहे. पण या प्रकरणाला जवळपास पाच वर्ष झाली असताना आजही स्मिथ यामुळे ट्रोल होताना दिसतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एजबस्टन कसोटीच्या चौथ्या दिवसाचा आहे. व्हिडिओत एजबस्टनच्या स्टॅन्डमधून चाहते स्मिथला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. स्मिथ यावर कुठल्याच प्रकारे प्रत्युत्तर देताना दिसला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर नाराजी मात्र स्वष्टपणे दिसून आली.

काय आहे सँडपेपर गेट स्कँडल
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघावर या बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर जगभरातून टीका झाली होती. तेव्हाचा ऑस्ट्रेलयन कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेविड वॉर्नर (David Warner), आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट (Cameron Bancroft) या तिघांना यात दोषी ठरले होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना कॅपटाउनमध्ये खेळला जात होता. याच सामन्यात ऑस्ट्रेलिन सलामीवीर बॅनक्रॉफ्ट मैदानात चेंडूशी छेडछाड करताना कॅमेरॉत कैद झाला होता. त्याने सॅडपेपरच्या मदतीने चेंडू घासण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून खेळपट्टीवर चेंडू टर्न मिळेल. याच कारणास्तव या प्रकरणाला क्रिकेट इतिहासात सँडपेपर गेट स्कँडल म्हणून ओळखले जाते. मात्र, संघाची ही रणनीती त्यांना चांगलीच महागात पडली.

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर कर्णधार स्मिथने सर्व आरोप मान्य केले. पत्रकार परिषदेत बोलताना स्मिथ अक्षहशः रडला होता. स्मिथ आणि वॉर्नरवर क्रिकेट खेळण्यापासून प्रत्येकी एक-एक वर्षाची, तर बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घातली गेली होती. सोबतच संघाच्या दोघांवर कर्णधारपदासाठीही बंदी घातली गेली. वॉर्नरवरील कर्णधारपदाची बंदी अद्यापही उठवली गेली नाहीये. (Steve Smith was trolled by spectators during the Edgbaston Test over the Sandpaper Gate scandal)

महत्वाच्या बातम्या –
शुबमन गिल-सारा तेंडुलकर पुन्हा चर्चेत; सचिनची लेक लवकरच तेंडुलकर आडनाव लावणं बंद करणार!
नेमार, रोनाल्डो अन् मेस्सी! यांंच्यापेक्षाही सुनिल छेत्रीने देशासाठी केलंय जीवाच रान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---