सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात सध्या ७२ वी ऍशेस मालिका (Ashes) सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होत असून शुक्रवारी या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवशी जॉनी बेअरस्टो याने शतक करत इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिले आहे.
तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात ७० षटकात ७ बाद २५८ धावा केल्या आहेत. बेअरस्टो १०३ धावांवर आणि जॅक लीच ४ धावांवर नाबाद आहेत. मात्र, अजूनही इंग्लंड संघ १५८ धावांनी पिछाडीवर आहे.
Stumps in Sydney 🏏
Jonny Bairstow's gritty century leads England's fightback on day three!#AUSvENG | #WTC23 | #Ashes pic.twitter.com/bxmhtWl6i9
— ICC (@ICC) January 7, 2022
स्टोक्स-बेअरस्टोने इंग्लंडला सावरले
तिसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात बिनबाद १३ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. पण, इंग्लंडला पहिल्या २० षटकातच मोठे धक्के बसले. हसीब हमीद (६) आणि जॅक क्रॉली (१८) या इंग्लंडच्या सलामीवीरांपाठोपाठ कर्णधार जो रूट शुन्यावर माघारी परतला. तसेच डेविड मलान देखील ३ धावांवर बाद झाला.
पण, यानंतर बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) इंग्लंडचा डाव सावरताना ५ व्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडला १५० धावांचा टप्पा पार करता आला. मात्र, खेळपट्टीवर स्थिर झाला असे वाटतानाच स्टोक्सला नॅथन लायनने पायचीत केले. स्टोक्सने ९१ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर जोस बटलरही लगेचच बाद झाला. बटलरला भोपळाही फोडता आला नाही.
अधिक वाचा – ऍशेस गमावलेल्या इंग्लंडला वॉर्नरने दिला ‘फुकटचा सल्ला’; म्हणाला…
मात्र, त्यानंतर मार्क वूडने बेअरस्टोला चांगली साथ दिली. त्यांनी ७ व्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करत इंग्लंडला २०० धावाचां टप्पा पार करून दिला. पण, वूडला पॅट कमिन्सने ३९ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. पण, असे असले तरी दिवसाच्या अखेरच्या षटकात बेअरस्टोने चौकारासह शतक पूर्ण करत दिवसाच्या खेळाचा शेवट गोड केला. बेअरस्टोचे हे कारकिर्दीतील ७ वे कसोटी शतक आहे, तर दुसरे ऍशेस शतक आहे. त्याच्या या शतकाने इंग्लंडला पहिल्या डावात पुनरागमन करता आले.
तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंडने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मिशेल स्टार्क, नॅथन लायन आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
व्हिडिओ पाहा – टोकियो ऑलिम्पिक… भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा
ऑस्ट्रेलियाकडून ख्वाजेचे शतक
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ४१६ धावांवर पहिला डाव घोषित केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून या डावात उस्मान ख्वाजाने १३७ धावांची शतकी खेळी केली. तसेच स्टीव्ह स्मिथने ६७ धावा केल्या. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटने केपटाऊन कसोटीत पुनरागमन केल्यास ‘या’ दिग्गजाला प्लेइंग इलेव्हनमधून द्या डच्चू, गंभीरचा सल्ला
“हार्दिक पंड्याकडून ज्या अपेक्षा करत होतो, त्या शार्दुल ठाकूर पूर्ण करत आहे”