इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या ऍशेस मालिका 2023 सामन्यांदरम्यान एकापेक्षा एक क्षण पाहायला मिळतात. आता नुकताच एक व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधत आहे. खरं तर, हा व्हिडिओ इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याचा आहे. बेअरस्टोने एका क्रिकेट चाहत्याचे मन जिंकले आहे. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बेअरस्टोने त्याच्या एका चाहत्याला फलंदाजीचे ग्लोव्ह्ज भेट म्हणून दिले आहेत. विशेष म्हणजे, बेअरस्टो स्वत: त्याच्या चाहत्याजवळ पोहोचला आणि त्याचा दिवस खास बनवला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बेअरस्टोने जिंकले सर्वांचे मन
जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याने चाहत्याला भेट देतानाचा व्हिडिओ सर्वांची मने जिंकत आहे. या व्हिडिओत दिसते की, त्याचा चिमुकला चाहता वॉकरच्या आधारे मैदानाच्या गेटजवळ उभा होता. त्याचवेळी जॉनी बेअरस्टो तिथून जात होता. यावेळी त्याची नजर चिमुकल्या मुलावर पडताच, तो त्याच्या जवळ गेला. कारण, चाहते वॉकरच्या साहाय्याने पोहोचला होता. यावेळी बेअरस्टोने त्याला ग्लोव्ह्ज भेट म्हणून देताच चाहत्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. यावेळी तो खूपच खुश दिसला.
Bairstow giving a pair of his gloves to a fan ????
Things you love to see! @englandcricket @HomeOfCricket#Ashes #CricketTwitter https://t.co/7mLZBEgyRl pic.twitter.com/2RHcL2cTK6
— It’s Just N̶o̶t̶ Cricket (@justnotcrkpod) June 30, 2023
आंदोलनकर्त्याला उचलून काढलेले बाहेर
यापूर्वी बेअरस्टो एका कारणामुळे चांगलाच चर्चेत होता. खरं तर, लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी जेव्हा आंदोलनकर्ते मैदानात खेळाडूंमध्ये घुसले होते, तेव्हा बेअरस्टोने आपली ताकद दाखवत आंदोलनकर्त्याला उचलून मैदानाबाहेर सोडले होते. यादरम्यानचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होते.
सामन्याची स्थिती
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर लॉर्ड्स कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 416 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाकडून झॅक क्राऊले आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर डकेटने दुसऱ्या विकेटसाठी ऑली पॉप याच्यासोबत 97 धावांची भागीदारी रचली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 4 विकेट्स गमावत 278 धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात, इंग्लंडने इतर 6 विकेट्सही अवघ्या 47 धावांवर गमावल्या. इंग्लंड पहिल्या डावात सर्वबाद फक्त 325 धावाच करू शकला. यात बेअरस्टोच्या फक्त 16 धावांचा समावेश होता. (ashes series 2023 cricketer jonny bairstow gives batting gloves to his fan watch video)
महत्वाच्या बातम्या-
अश्विनकडून पाकिस्तानच्या बॉलिंग अटॅकचं कौतुक, स्पिनर्सची खाण असलेल्या ‘या’ संघाकडून उलटफेरची अपेक्षा
MPL 2023 गाजवलेले टॉप फाईव्ह धुरंधर! क्रिकेटजगताला घ्यायला लावली आपली दखल