ऑस्ट्रेलिया संघाने ऍशेस मालिकेत (ashes series) विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने ऍशेस मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करला आणि ते ०-३ अशा पिछाडीवर आहेत. अशात मालिकेतील राहिलेल्या दोन कसोटी सामन्यात विजय मिळवण्याचा इंग्लंड संघाचा प्रयत्न असेल. परंतु चौथा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाला एक मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्वरवुड (chris silverwood) पुढच्या सामन्यासाठी संघासोबत उपस्थित नसतील.
इंग्लंड संघात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे सिल्वरवुडवर संघापासून वेगळे होण्याची वेळ आली आहे. तत्पूर्वी इंग्लंड संघात कोरोनाचे सात रुग्ण आढळले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर सिल्वरवुडला विलगीकरणात राहावे लागणार आहे. इंग्लंड संघातील एका व्यक्तिच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाचे संक्रमण झाले होते, त्यानंतर सिल्वरवुडला देखील विलगीकरणात राहण्याची वेळ आली. असे असले तरी, त्यांना कोरोनाची लागण असल्याचे कोणतेच लक्षण दिसत नाही, अशी माहिती मिळत आहे.
आता सिल्वरवुड त्यांच्या कुटंबासोबत मेलबर्नमध्येच पुढच्या १० दिवसांसाठी विलगीकरणात असतील, ज्याठिकाणी उभय संघातील तिसरा कसोटी सामना खेळला गेला होता. आता चौथा कसोटी सामना ५ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. सोमवारपासून आतापर्यंत इंग्लंड संघाचे सपोर्ट स्टाफमधील तीन आणि कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा- दुसऱ्या डावात बाद होऊन माघारी परतल्यानंतर विराटने दिली ‘अशी’ रिॲक्शन, फोटो व्हायरल
दरम्यान, संघाला चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी शुक्रवारी सिडनीला रवाना व्हायचे आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ चार्टर्ड विमानाने सिडनीसाठी रवाना होतील. सिडनीमध्ये संघांची व्यवस्था करण्यासाठी संपूर्ण हॉटेल आरक्षित केले गेले आहे. तत्पूर्वी उभय संघातील तिसरा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला गेला असून, यामध्ये इंग्लंडला मोठा पराभव मिळाला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात एक डाव आणि १४ धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने १८५ धावा केल्या, त्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने २६७ धावा करून आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंड संघ अवघ्या ६८ धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात घेतलेली आघाडी पार करता न आल्याने इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला.
महत्वाच्या बातम्या –
काय सांगता? भज्जीने विराटला म्हटले होते दुसरी आई? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
‘तो’ दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते
“यॉर्कर किंग!” जसप्रीत बुमराहने टाकलेल्या ‘त्या’ चेंडूची सोशल मीडियावर रंगतेय चर्चा
व्हिडिओ पाहा –