टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये आनंदाचे वातावरण होते. पणस त्यानंतर वादग्रस्त कृत्यानंतर टीम पेनने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट ढवळून निघाले. पेनच्या राजीनाम्यानंतर अनेक लोकांनी याबाबत आपले मत मांडले, काहींनी पेनवर टीका केली, तर काहींनी त्याला समर्थन देण्याचा प्रयत्न केला आहे. आता ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथन लायन टीम पेनच्या बाजूने उभा राहिला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेसाठी टीम पेनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केल्याने ऑस्ट्रेलिया संघाचे लक्ष विचलित होणार नाही, असे ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथन लायनने म्हटले आहे. दुसरीकडे, टीम पेनबद्दल सुरू असलेली चर्चा अद्याप संपलेली नाही. पेनचा संघात समावेश केल्याने खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ शकते, असे माजी कर्णधार रिकी पाँटिंगने म्हटले होते. पाँटिंगच्या या वक्तव्यानंतर लायनची प्रतिक्रिया आली आहे. लायन म्हणाला की, मला वाटत नाही की याने कोणाला काही फरक पडेल.
लायन म्हणाला की, ‘शेवटी आम्ही सर्व व्यावसायिक खेळाडू आहोत. काय करायचे आणि कसे पुढे जायचे हे आम्हाला माहित आहे. निवडकर्ते सांगत आहेत की ते सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडतील. पण माझ्या मते टीम पेन हा जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे.’
लायन पुढे म्हणाला, ‘मला तो संघात हवा आहे. गोलंदाज म्हणून मी स्वार्थी असू शकतो, पण मला सर्वोत्तम यष्टिरक्षक यष्टीमागे हवा आहे आणि तो पेन आहे, असे मला वाटते. प्रत्येक कसोटी गोलंदाजाचे पेनशी खूप चांगले संबंध आहेत आणि तो खूप चांगला माणूस आहे. ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूममध्ये तो एक आदरणीय व्यक्ती आहे.’
टीम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा का दिला?
टीम पेनवर २०१७ साली आपल्या सहकारी महिला कर्मचाऱ्याला आक्षेपार्ह फोटो आणि संदेश पाठवल्याचा आरोप आहे आणि हा घोटाळा समोर आल्यानंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्याने सध्या क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीने संघ व्यवस्थापन गोत्यात, मुंबई कसोटीत रहाणेवर टांगती तलवार
…म्हणून सुरेश रैना आहे जगातील सर्वात दिलदार व निस्वार्थी क्रिकेटर
क्रिकेटमध्ये ७ वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना, ज्यामुळे हेलावले होते संपूर्ण क्रिकेटजगत