आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांना पळता भुई थोडी करणारा गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराहने अनेक दिग्गजांना आपला चाहता बनवले आहे, त्यात आशिष नेहराचाही समावेश आहे.
नेहराने नुकतेच बुमराह विषयी बोलतांना म्हटले आहे की, तो फलंदाजांच्या विचारांशी खेळतो, यामुळेच त्याची गणना आजच्या काळातील सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये केली जाते.
आशिष नेहरा म्हणाला, ‘मला वाटते की जसप्रीत बुमराह त्याच्या चुकांची पुनरावृत्ती करत नाही. जर तुम्ही त्याची आकडेवारी पाहिली तर बुमराहने मालिकेच्या सुरुवातीला नॉटिंगहॅम येथे पहिल्या सामन्यात ६-७ विकेट्स घेतल्या. यानंतर त्याने मालिकेत १८ विकेट्स घेतल्या. एका कसोटी सामन्यात त्याला बळी घेता आले नाही पण त्याने शानदार पुनरागमन केले. कुठे जास्तीच्या प्रयत्नांची गरज आहे हे त्याला माहीत आहे.’
जसप्रीत बुमराहने या मालिकेदरम्यान एकूण १८ विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या ऑली रॉबिन्सनने एकूण २१ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहची तुलना जेम्स अँडरसनशी करताना आशिष नेहरा म्हणाला, ‘जिमीला खूप अनुभव आहे. बुमराह १०० कसोटी सामने खेळणारा खेळाडू नाही. तो इतरांच्या चुकांमधून शिकतो ही त्याची जमेची बाजू आहे. हा त्याच्या गोलंदाजीतील एक्स-फॅक्टर आहे.
ओव्हल कसोटीत बुमराहच्या शानदार स्पेलवर आशिष नेहरा म्हणाला, ‘त्याने फक्त दोन विकेट्स घेतल्या, पण ज्या प्रकारे खेळ चालू होता आणि ज्या प्रकारे बुमराहने तो उत्कृष्ट स्पेल टाकला, त्यामुळे इंग्लंडला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.’ सामान्य दरम्यान चर्चा सुरू होती की ही फलंदाजांना अनुकूल खेळपट्टी आहे. पण बुमराहने सर्वांना खोटे ठरवत उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: इंग्लड दौरा गाजवल्यानंतर सीएसकेचे शार्दूल, जडेजा, पुजारा पोहचले दुबईत, आता राहणार क्वारंटाईन
प्लेसिसची भविष्यवाणी! ‘हे’ तिघे विश्वचषकात ठरणार दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रम्पकार्ड
जोकोविचला ‘कॅलेंडर ग्रँडस्लॅम’ जिंकण्याची संधी, पण नक्की हे आहे तरी काय? घ्या जाणून