---Advertisement---

आयपीएल सुरू होण्याआधीच सीएसकेला मोठा धक्का, प्रमुख फलंदाज झाला दुखापतग्रस्त

On: रविवार, सप्टेंबर 12, 2021 11:16 PM
csk
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) च्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला आता फक्त ६ दिवस शिल्लक आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ससाठी (सीएसके) तत्पूर्वी एक वाईट बातमी आली आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल २०२१) मध्ये खेळणारा संघाचा सलामीवीर फाफ डू प्लेसिस जखमी झाला असून, त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले आहेत. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे सध्या माहित नाही. प्लेसिस सीपीएलमध्ये सेंट लुसिया किंग्सचा कर्णधार आहे.

सीपीएलच्या सामन्यात झाली दुखापत
सीपीएलच्याच शेवटच्या साखळी सामन्यात त्याने बार्बाडोस रॉयल्सविरुद्ध ५४ चेंडूत ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याच्या खेळीमुळे, सेंट लुसियाने केवळ सामना जिंकला नाही, तर सीपीएल २०२१ च्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्लेसिसची बॅट शांत होती. त्याने पहिल्या ४ सामन्यांमध्ये ०, १०, १४ आणि २ धावा केलेल्या. मात्र, ४ सप्टेंबरला सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ६० चेंडूत १२० धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीत त्याने १३ चौकार आणि ५ षटकार मारले. प्लेसिसने तब्बल २०० च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. १२० पैकी ८२ धावा चौकार व षटकारांनी आलेल्या होत्या.

आयपीएलमध्ये खेळताना दिसेल प्लेसिस
आगामी टी२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघाचा भाग नसलेला प्लेसिस १९ सप्टेंबरपासून युएई येथे सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित हंगामात खेळताना दिसेल. कोरोनामुळे हा हंगाम स्थगित केला गेला तेव्हा प्लेसिस ७ सामन्यात ६४ च्या सरासरीने ३२० धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर होता. विशेष म्हणजे त्याने सलग चार सामन्यात चार अर्धशतके झळकावली होते. मात्र, आता तो दुखापतग्रस्त झाल्याने सीएसके संघ व्यवस्थापन चिंतेत पडले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---