---Advertisement---

‘हा’ भारतीय क्षेत्ररक्षक जोंटी रोड्सपेक्षाही श्रेष्ठ..! पाहा काय म्हणाला माजी क्रिकेटपटू?

On: शनिवार, एप्रिल 19, 2025 9:30 PM
---Advertisement---

यंदाच्या आता आयपीएल हंगामातील (IPL 2025) जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण झाला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या मेगा स्पर्धेत फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही आपली छाप पाडली आहे, परंतु क्षेत्ररक्षकही मागे राहिले नाहीत. दरम्यान काही शानदार झेल पाहिले गेले आहेत आणि काही असाधारण धावबाद देखील झाले आहेत. तत्पूर्वी गुजरातच्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यापूर्वी, टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराला सामन्यापूर्वी त्यांच्या मते सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण आहे? असे विचारण्यात आले तेव्हा त्यांनी एकही क्षण वाया न घालवता रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) नाव घेतले.

अँकरने असा प्रश्न विचारला असता नेहरा म्हणाला, “मी अनेक क्षेत्ररक्षक पाहिले आहेत. काही आउटफिल्डमध्ये सर्वोत्तम आहेत, तर काही 30 यार्ड वर्तुळात चांगले आहेत. उदाहरणार्थ, जॉन्टी रोड्स हा वर्तुळात सर्वोत्तम आहे. पण जर तुम्ही एकंदर विचारले तर एबी डिव्हिलियर्सचे नाव लक्षात येते. अँड्र्यू सायमंड्स आणि रवींद्र जडेजा यांची नावेही लक्षात येतात. पण मी जडेजाला त्याच्यापेक्षा पुढे ठेवेन, ते जडेजाच्या वयामुळे नाही. 2008-09 पासून आतापर्यंत जडेजा तसाच आहे. तो काय खातो हे मला माहित नाही. जर तो काही वेगळे खात असेल तर त्याने आम्हाला सांगावे.”

गुजरात विरूद्ध दिल्ली सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, शनिवारी (19 एप्रिल) दिवसाच्या पहिल्या सामन्यात, गुजरात टायटन्सने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने पराभव केला आणि गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरातची सुरुवात खराब झाली कारण त्यांनी कर्णधार शुबमन गिल (7 धावा) स्वस्तात गमावला, परंतु त्यानंतर जोस बटलरने (54 चेंडूत नाबाद 97 धावा, 11 चौकार, 4 षटकार) टिकून राहून गुजरात टायटन्सला 4 चेंडू आणि 7 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

बटलरला शेरफेन रुदरफोर्डने (43 धावा, 34 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार) चांगली साथ दिली. गुजरातला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी 10 धावा करायच्या होत्या आणि राहुल तेवतियाने मिचेल स्टार्कच्या पहिल्या 2 चेंडूंवर अनुक्रमे 1 षटकार आणि 1 चौकार मारून गुजरातला दमदार विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---