पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय गोलंदाज आशिष नेहराला त्याच्या निवृत्तीनिमित्त ट्विटरवरून खास संदेश दिला आहे. त्याने या संदेशात नेहराला प्रामाणिक आणि चांगला वेगवान गोलंदाज म्हटले आहे.
शोएब अख्तरने ट्विटरवर लिहिले आहे की ” चांगल्या आणि प्रामाणिक वेगवान गोलंदाजांपैकी एक असणारा नेहरा अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. नेहरा तुझ्या विरुद्ध खेळताना आनंद मिळाला.”
1 of the nicest guy & honest fast bowler has retired from INTL cricket .A Nehra it was pleasure playing against u #Cheers fella#
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 2, 2017
आशिष नेहराने १ नोव्हेंबरला न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यानंतर निवृत्ती घेतली. त्याने भारताकडून १८ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत १६४ सामने खेळताना २३५ बळी घेतले आहेत.
या बरोबरच शोएबने पाकिस्तान संघ टी २० क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदनाचेही ट्विट केले आहे.
Pakistan No.1 in T 20 format…Congratulations….
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 2, 2017