---Advertisement---

आशिष नेहराने मारली चहलच्या कंबरेत लाथ, गुजरातने शेअर केलेल्या फोटोची रंगलीय चर्चा

On: मंगळवार, मे 24, 2022 5:10 PM
Yuzvendra-Chahal
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ हंगामातील प्लेऑफचे सामने मंगळवारी म्हणजेच २४ मे पासून सुरू होणार आहेत. पहिला क्वालिफायर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. उभय संघातील हा सामना जो संघ जिंकेल, त्याला थेट अंतिम सामन्यात संधी मिळणार आहे. सामना सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून काही फोटो शेअर केले गेले आहेत. फोटोत आशिष नेहरा युजवेंद्र चहलच्या कंबरेत लाथ मारताना दिसत आहे.

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvebdra Chahal) त्याच्या मजेशीर अंदाजासाठी ओळखला जातो, तर भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra) देखील अनेकदा मैदानात अशाच प्रकारे मजा- मस्ती करताना दिसला आहे. आयपीएल २०२२मध्ये या दोघांनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. चहलने राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करताना हंगामात सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत, तर दुसरीकडे प्रशिक्षकाच्या भूमिकेत नेहराने यावर्षी नव्याने सहभागी झालेला संघ गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले आहे.

आता मंगळवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर राजस्थान आणि गुजरात संघांचा आमना-सामना होणार आहे. या क्वालिफायर एक सामन्यापूर्वी चहल आणि नेहरा यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध चाहत्यांना पाहायला मिळाले. नेहराने मजेमध्ये चहलच्या कंबरेत लाथ मारल्याचे फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य देखील पाहायला मिळत आहे. गुजरात टायटन्सने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर वेगात व्हायरल होत आहेत.

दरम्यान, उभय संघातील हा क्वालिफायर सामना मंगळवारी खेळला जाणार असून, सोमवारी म्हणजेच २३ मे रोजी रात्री दोन्ही संघांचे सराव सत्र आयोजित केले गेले होते. यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांच्या गाठीभेटी झाल्या. चहल आणि अफगाणिस्तानी दिग्गज राशिद खान यांची भेट झाली. दरम्यान, मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात खराब वातावरणामुळे व्यत्यय येण्याची शक्यता आहे. पावसाच्या कारणास्तव जर सामना खेळला गेला नाही, तर गुजरात टायटन्स गुणतालिकेतील पहिल्या स्थानामुळे अंतिम सामन्यात जाईल, तर राजस्थानला मात्र क्वालिफायर दोनमध्ये खेळावे लागेल.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानच्या बाबर आझमवर आयपीएलमध्ये ‘या’ टीमने लावले असते कोट्यवधी, अख्तरचा दावा

नया है यह! वेगवान गोलंदाजाने टाकलेला चेंडू झाला स्पिन, फलंदाजाच्याही उडाल्या दांड्या

मॅच सुरू असतानाच मेंडिसच्या छातीत असह्य वेदना, दाखल करावं लागलं थेट हॉस्पिटलमध्ये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---