भारतीय संघाचा आशिया चषक 2022 मधील प्रवास संपुष्टात आला आहे. साखळी फेरीतील विजयी प्रदर्शनानंतर सुपर-4 फेरीत भारतीय संघाची गाडी रुळावरून खाली घसरली आणि त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढावली. यानंतर आता भारतीय संघ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषक 2022 साठी कसून तयारीला लागेल. दरम्यान माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केली आहे.
नेहराने (Ashish Nehra) सर्वांना चकित करत दुखापतीशी झुंज देत असलेल्या रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला संघात निवडले आहे. याखेरीज त्याने निवडलेल्या संघात बरीचशी चकित करणारी नावे आहेत. नेहराने टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) निवडलेला संघ जवळपाच तो संघ आहे, जो सातत्याने मागील काही महिन्यांपासून टी20 क्रिकेट खेळत आहे.
सूर्यकुमार यादव असेल सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडू
आयसीसीच्या टी20 विश्वचषकासाठी संबंधित एका विशेष कार्यक्रमात बोलताना नेहरा म्हणाला की, जो भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी गेला होता, त्यामध्ये बदलांची फार कमी शक्यता आहे. नेहराने निवडलेल्या संघात कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल सलामी देतील. तर सूर्यकुमार यादव संघाचा महत्त्वाचा भाग असेल. तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यात पारंगत आहे. तो कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ दाखवू शकतो, असे नेहराला वाटते.
मोहम्मद शमीलाही निवडण्याचा दिला सल्ला
वेगवान गोलंदाजी विभागात नेहराने जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांना निवडले आहे. तसेच नेहराला वाटते की, मोहम्मद शमीकडेही टी20 विश्वचषकासाठी संघात निवडले जाण्याचे पूर्ण कौशल्य आहे. त्याच्याबाबतीत भारताच्या संघ व्यवस्थापनाने योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे. फिरकीपटूच्या रूपात रविंद्र जडेजा, आक अश्विन आणि युझवेंद्र चहल आहेत. जडेजा आणि हार्दिक पंड्या अष्टपैलूची भूमिका बजावू शकतात. तसेच दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत यांना यष्टीरक्षक म्हणून नेहराने संघात जागा दिली आहे.
टी20 विश्वचषकासाठी नेहराने निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा(कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, दीपक हुड्डा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोहलीचा क्लास गांगुलीपेक्षा वरचढं! खुद्द ‘दादा’नेच केलं स्पष्ट
आशिया चषकातील हाराकिरीनंतर अफगाणिस्तानचा संघ संकटात, लंडनमध्ये बसलाय अडकून
‘दुखापतीनंतर पुनरागमन सोपे नव्हते’, कर्णधार राहुलने सांगितली ‘कमबॅक’ची कहाणी